अखेर चिकन मार्केटजवळील ‘तो’ कचरा नगरपालिकेने हटवला

नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेविका शमी साळकरांच्या प्रयत्नातून झालं शक्य

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः रविवारी मुख्य शहरातील चिकन मार्केटजवळील कॉविडच्या नियमावलीला पायदळी तुडवून चिकन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. या गर्दीमुळे त्या बाजूला कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात साठलेला कचऱ्याचा ढीग सोशल मीडियावर वायरल झाल्याने सोमवारी अखेर हा कचरा उचलण्यात आला.

हेही वाचाः ‘आप’कडून राज्यात २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रांची सुरुवात

म्हणून साठला एवढा कचरा

तौक्ते चक्रीवादळामुळे तसंच पूर्वीचा कचरा उचलणारा ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्याने चिकन मार्केटजवळ कचरा साठून राहिला होता. ठेकेदार बदलल्याने सोमवारी हा कचरा साफ करण्यात आला. आता या पुढे दररोज वेळच्या वेळी येथील कचरा साफ करण्यात येणार आहे, असं मुरगाव नगरपालिकेच्या प्रभाग 13 मधील नगरसेविका शमी साळकर यांनी सांगितलं.

पावसाळ्यापूर्वी कचरा साफ करणार

मी नगराध्यक्षपदाचा ताबा घेऊन थोडेच दिवस झालेत. पण आज मी स्वतः लक्ष घालून हा कचरा उचलायला लावला आहे. चिकन मार्केटजवळ साठलेल्या कचरा बेलिग मशीनच्या मदतीने इथे टाकला जात होता. मशीन मोडल्यामुळे तो कचरा तिथेच राहिला आणि मार्केटमधील लोकही तिथेच कचरा टाकू हा ढीग वाढला. पण पावसाळ्यापूर्वी मुरगावातील कचरा प्राधान्याने साफ करणार असल्याचं नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!