अखेर शेरीफ जॅकीस यांनी दिला वेर्णा पोलीस स्थानकाचा ताबा

प्रशल नाईक देसाई वेर्णा पोलीस स्थानकाचे नवे पीआय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: दक्षिण गोव्यातील वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी अखेर मंगळवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्याकडे ताबा दिला.

हेही वाचाः कॅबिनेट बैठकीत काय काय निर्णय झाले?

बदलीचा आदेश जारी होऊन सहा महिन्याहून अधिक काळ लोटला

पोलीस स्थापना मंडळाच्या सुचनेनुसार मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आदेश जारी करून वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक शेरीफ जॅकीस याची बदली सुरक्षा विभागात केली होती. तर त्याच्या जागी  सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांची बदली केली होती. दरम्यान बदलीचा आदेश जारी होऊन सहा महिन्याहून अधिक काळ लोटला होता. त्यानंतर पोलीस खात्याने चार दिवसांपुर्वी निरीक्षक नाईक देसाई यांना सायबर विभागातून  मुक्त  करण्याचा आदेश जारी करून वेर्णा पोलीस स्थानकाचा ताबा घेण्यास सांगितलं होतं. त्यामुळे निरीक्षक जॅकिस यांनी सबंधित पोलीस स्थानकाचा ताबा नाईक देसाई यांना देणं बंधनकारक होता. असं असतांना जॅकीस यांनी राजकीय दबाव वापरून हे स्थानक ते सोडण्यास तयार नसल्यामुळे हजेरी लावलेला पोलीस निरीक्षक नाईक देसाई यांच्याकडे ताबा देण्यास नकार दिला. तसंच ताबा सुपूर्द करण्यापुर्वी जॅकीस हे पोलीस स्थानकातूनच गायब होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी पोलीस स्थानकात दाखल झाले.

सोमवारी मध्यरात्री दिला ताबा

वेर्णा पोलिस स्थानकातून आपण मुक्त होऊ नये यासाठी त्यांनी आपलं राजकीय वजन वापरलं आहे. सासष्टीतील एका वजनदार राजकारणी, त्यांची पत्नी व काही पंचसदस्यांसह जॅकीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातले आहे. शिवाय वेर्णा पोलीस स्थानकाची खुर्ची जाऊ नये म्हणून त्याने एका धर्मगुरूंचाही आधार घेतलाची जोरदार चर्चा खात्यात सुरु होती. नंतर सोमवारी मध्यरात्री ११.४५ वाजता निरीक्षक जॅकीस यांनी निरीक्षक नाईक देसाई याच्याकडे वेर्णा पोलीस स्थानकाचा  ताबा दिला.

हेही वाचाः ROBBERY | वेर्ला काणका येथे घर फोडून दागिने लंपास

या प्रकारामुळे निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांना मात्र विना ताबा ताटकळत चार दिवस राहावं लागलं आहे. 

हा व्हिडिओ पहाः Politics | Bjp | Dabolim | सदानंद शेट तानावडेंचा पत्रकार परिषदेतून खोचक टोला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!