RESCUE | अखेर आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ‘त्या’ नागाला मिळाले जीवदान

नेसाई मडगावातील घटना; डांबराने माखलेल्या नागाची सुखरूप सुटका; वनखात्याची कौतुकास्पद कामगिरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कधी-कधी मनु्ष्याच्या विकासाची हाव प्राण्यांच्या जीवावर बेतते. याचंच एक उदाहरण मडगावातील नेसाई येथे पाहायला मिळालं… या ठिकाणी चक्क एक डांबराने माखलेला नाग पहायला मिळाला. दैनिक पुढारीने ही बातमी सर्वप्रथम पुढे आणली आहे.

हेही वाचाः Video | थरारक | अडीच तासापर्यंत सुरू होते सिलिंडरचे स्फोट

डांबराने माखलेला नाग

मडगावातून ७ किलोमिटर नागाच्या अंगावर डांबराने माखलेल्या ‘स्पेक्टेकल कोब्रा’ म्हणजेच नागाला वनखात्याने जीवदान दिलं. या नागाच्या अंगावर डांबराचा थर बसल्याने त्याचा जबडा, एक डोळा व नाकपुडी पूर्ण बंद झाली होती. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर नागाच्या अंगावरील डांबर काढून वनखात्याकडून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

हेही वाचाः साळ गडे उत्सवाबाबत सरकारी यंत्रणेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

तर नाग मेला असता…

राज्याच्या वनखात्याकडून वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. बऱ्याचदा रहिवाशी भागात जे साप आढळतात, त्यांना जीवे न मारता, त्यांना काळजीपूर्वक पकडून जंगलात सोडलं जातं. यावेळी ही घटना थोडी वेगळी होती. नाग डांबराने पूर्णपणे माखला होता. त्याला वेळीच मदत मिळाली नसती तर तो गुदमरून मेला असता. मात्र नागाला जीवदान देण्यात वनखात्याला यश आलंय.

अशी केली नागाची मदत…

सर्वप्रथम नागाचा जबडा, नाकपुडी आणि एक डोळा स्वच्छ करण्यात आला. हे करण्यासाठी दीड तासांचा वेळ द्यावा लागला. त्यानंतर खोबरेल तेल, कोरफड जेल वापरून नागाला स्वच्छ करण्यात आलं. हा साप विषारी असल्याने तोंडाजवळचं डांबर काढताना सापाच्या तोंडात टॉवेल ठेवला आणि डांबर काढण्यात आलं. डांबर काढल्यावर नागाच्या अंगावर नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असणारी हळद लावण्यात आली. त्यानंतर नागाला बारा तासांसाठी निरीक्षणाखाली ठेवलं आणि वीस तासांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. या सगळ्यासाठी वनखात्याने प्राणीमित्र बेनहेल अंताव यांची मदत घेतली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!