भू रूपांतर जनहित याचिकेची अंतिम सुनावणी २८ रोजी

फेडरेशन ऑफ रॅनबो वॉरियर, गोवा फाऊंडेशन, गोवा बचाव अभियान यांनी दाखल केली जनहित याचिका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सरकारने विधानसभा अधिवेशनात नगरनियोजन कायद्यातील १६ बी कलमात दुरुस्ती करून भू रूपांतर करण्यास मोकळी दिली होती. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल करून आव्हान दिलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या सर्व जनहित याचिका एकत्र करून २८ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणीसाठी ठेवली आहे.      

खंडपीठात जनहित याचिका दाखल

या प्रकरणी फेडरेशन ऑफ रॅनबो वॉरियर, गोवा फाऊंडेशन, गोवा बचाव अभियान, तसंच इतर बिगर सरकारी संस्थांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल करून आव्हान दिलं आहे. या जनहित याचिकेत याचिकादाराने राज्य सरकार, नगरनियोजन सचिव, नगरनियोजन खाते तसेच नगरनियोजन महामंडळ यांना प्रतिवादी केले आहे.      

अंतिम सुनावणी २८ रोजी

सरकारने नगरनियोजन कायदा १६ बी कलमात दुरुस्ती करून भू रूपांतर करण्यास मोकळी दिल्याच्या निर्णयाला खंडपीठात आव्हान दिल्यानंतर सरकारला भू रूपांतर अर्ज स्वीकारून प्रक्रिया सुरू करण्यास खंडपीठाने मोकळीक दिली. परंतु संबंधित अर्जांना अंतिम मान्यता दिल्यास, तो निर्णय या जनहित याचिकेच्या निकालावर अवलंबून राहणार असल्याचा निर्देश खंडपीठाने अगोदर दिला होता.

हेही वाचाः Delta Corp Entertainment Project | डेल्टा कॉर्पच्या कॅसिनोला धारगळीत विरोध

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!