खास फेरीसेवेचे ‘हे’ आहेत दर…

फेरी सेवा ही येथील स्थानिकांचं जुनं प्रवासाचं माध्यम राहिलंय

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः
गोवा म्हटलं तरी पहिला डोळ्यासमोर येतो तो समुद्र, नद्या आणि निसर्ग. निसर्गाचा आस्वाद घेत, पाण्याची खळखळ ऐक प्रवास करणं कुणाला नाही आवडत… आज रस्त्यांवर ट्रॅफिक वाढलेलं दिसतं. प्रवास करताना सततचे गाड्यांचे वाजणारे हॉर्नही नकोसे वाटतात. शिवाय वाढते अपघात पाहता प्रत्येकजण आपला जीव मुठीत घेऊनच बाहेर पडतो. गोव्यात एका तिरावरून दुसर्या तिरावर प्रवशांची ने-आण करणार्या फेरी बोटी नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. फेरी सेवा ही येथील स्थानिकांचं जुनं प्रवासाचं माध्यम राहिलंय. या फेरीसेवेशी निगडीत सरकारने एक मोठा र्णय घेतलाय. गोव्यातील सर्व जलमार्गांवर खास फेरीसेवा सुरू करण्याची तयारी सरकारने दाखवलीये. त्याचबरोबर अशी फेरी सेवा हवी असल्यास सरकारने नवे दरही जाहीर केलेत.

नव्या फेरी सेवेचे दर…

गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्याने गोवेकरांसाठी खास फेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. नाईट शिफ्ट्स (रात्र पाळी) करणार्या अनेकांचा रात्रीच्या अंधारातील प्रवास थोडा सोपा व्हावा. त्याचबरोबर कुणी आजारी पडल्यास कमी वेळेत त्या व्यक्तीला योग्य ते उपचार मिळावेत म्हणून ही फेरी सेवा सोयीची ठरणार असल्याचं सरकारचं मानणं आहे. कुठ्ठाळी -मडकई फेरीचे २५० रुपये, तर इतर सर्वत्र १०० रुपये दर ठेवले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!