श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आयुर्वेदिक महाविद्यालयातील खाते व्यवस्थापक विज्वल प्रभूदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिरोडा येथील श्रीमती कमलाबाई हेदे विद्यालयात पालक-शिक्षक संघाच्या वतीने 10वीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक महाविद्यालयातील खाते व्यवस्थापक विज्वल प्रभूदेसाई, आदर्श विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हेदे, पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रूपेश नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाटील, आदर्श विद्याप्रसारक मंडळाचे उपसचिव संदीप प्रभू गांवकर, पालक-शिक्षक संघाची सचिव जयमाला शिरोडकर आणि ज्येष्ठ शिक्षक विजय परूळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्य सादर करून केली. पुष्पगुच्छ देऊन स्वाहत करण्यात आलं. शिक्षिका प्राची सामंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी सर्वांचं स्वागत करून वार्षिक अहवाल सादर केला. पालक-शिक्षक संघाच्या सचिव जयमाला शिरोडकर यांनी गतवर्षाचा ताळेबंद सादर केला.

त्यानंतर 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा साजरा झाला. विद्यालयात 94 टक्के घेऊन प्रथम आलेली मेघना हनुमंतराज जोगर हिचा गौरव करण्यात आली. तसंच द्वितीय रिद्धी रोहीदास कुंकळेकर 93 टक्के, तर तृतीय बास्वी विनोद नाईक 92 टक्के त्याबरोबर सर्व विशेष योग्यता प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा ‘स्मृतिचिन्ह’ देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे विज्वल प्रभु देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रूपेश नाईक यांचं समायोजित भाषण झालं. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत हेदे यांनी यशाचं श्रेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना दिलं.

त्यानंतर पालक-शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली. पुढील तीन वर्षासाठी रूपेश नाईक यांची सर्व संमतीने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी – विनोद नाईक (उपाध्यक्ष), अस्मिता नाईक (सचिव), शर्मिला गावणेकार (उपसचिव), मोलू वेळीप (कोषाध्यक्ष), भारती पेडणेकर (शिक्षणतज्ज्ञ).

हा व्हिडिओ पहाः Goa Entry Point | Patradevi Checkpost | तपासणीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर गर्दी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!