मोरजीत मान्यवरांचा सत्कार, बक्षीस वितरण उत्साहात

मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोरजीतील मान्यवरांचा सत्कार आणि विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच विजेत्यांमध्ये बक्षीस वितरण करण्यात आलं आणि देणगी कुपनाचा निकाल जाहीर करण्यात आला.

कोविड योध्यांचा सत्कार

यावेळी नवनिर्वाचित जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर; गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका या तीन राज्यातील आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार प्राप्त झालेल्या मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर; अग्नीशमन दलाचे दीपक शेटगावकर; सामाजिक कार्यकर्त्ये तुकाराम शेटगावकर आणि कोरोना काळात सेवा पुरवणारे डॉक्टर जोसेफ फर्नांडिस यांनी सेवा पुरवल्याबद्दल कोरोना योध्या म्हणून त्यांचा माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर, आमदार दयानंद सोपटे आणि जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसंच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

१९ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर, आमदार दयानंद सोपटे, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, आम आदमी पक्षाचे नेते प्रसाद शहापूरकर, काँग्रेस युवा नेते सचिन परब, माजी जिल्हा सदस्य दीपक कलंगुटकर, सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच मुकेश गडेकर, मोरजी जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ अध्यक्ष नाना उर्फ चन्द्रो दाभोलकर, उत्सव समितीचे अध्यक्ष देवानंद गावडे आदी उपस्थित होते.

विजेत्यांमध्ये बक्षिस वितरण

सत्कार मूर्तीचा परिचय व्ही. जी. शेटगावकर यांनी करून दिला, तर नाना दाभोलकर, श्रेया फडते, संतोषी शेटगावकर, वैष्णवी आजगावकर, दिप्तेश हळणकर, श्रीकृष्ण आजगावकर, हरी नाईक, दिनकर हळणकर, प्रसन्नकुमार शेटगावकर, सुर्यकांत पेडणेकर आदींनी पाहुण्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी श्रीया तेबकर, श्रीशा शेटगावकर, आपा फडते, वरदा शेटगावकर, ऋग्वेद तीळोजी, स्वरा सावंत, सानिका बागकर, शाश्वत कान्नाइक, सांज आजगावकर, मयंक शेटगावकर, पूर्वा तेमबकर, सही नाईक, नितीका गडेकर, दामिनी वाडजी, अभिनव गोसावी, सुरभी शेटगावकर, अवनी शेटगावकर, आर्या अमित शेतगावकार, ऋतुजा शेटगावकर, अमिषा शिरोडकर, खुशी शेटगावकर, निशिता शेटगावकर, त्रिशा नाईक, श्रुती परब, अवनी शेटगावकर, क्रिश मांद्रेकर, अमय शेटगावकर, त्रंबकेश गुरव, केव्या तीळोजी, दामिनी वाड्जी, नियती शेटगावकर, अनुष्का शेटगावकर, रुद्रेश तिळोजी यांना विविध स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल त्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी पार्सेकर, आमदार सोपटे, परब, कोरगावकर आदींची भाषणं झाली. मान्यवरांच्या हस्ते देणगी कुपनचा निकाल जाहीर करण्यात आला. शेवटी निवृत्ती शिरोडकर यांनी आभार मानले.

हा व्हिडिओ पहाः Narendra Modi Birthday | चक्क भंगाराच्या साहित्यापासून साकारला मोदींचा पुतळा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!