‘आप’च्या भीतीने मुख्यमंत्र्यांनी गोव्यासाठी मोफत पाण्याची घोषणा केली

'आप'चे गोवा संयोजक राहुल म्हांबरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा आणि गोव्याच्या राजकारणावर आम आदमी पार्टीचा (आप) परिणाम होणार, याची भीती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात स्पष्टपणे दिसत होती. या भीतीनेच त्यांनी गोव्यासाठी मोफत पाणी योजना जाहीर केली. ही घोषणा ऐकल्यानंतर गोंयकारांना हे जाणून घ्यायचं आहे, की ही घोषणा करायला भाजपला इतका वेळ का लागला? असा सवाल ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरेंनी केलाय.

हेही वाचाः प्रियोळ, शिरोड्यात विजयाची पूर्ण खात्री: मनोज परब

भाजप गोव्यातील ‘आप’च्या उपस्थितीमुळे घाबरलं

भाजप, ज्याने आपल्या नागरिकांना काहीही मोफत देण्यास नकार दिला होता, तो पक्ष आता गोव्यातील ‘आप’च्या उपस्थितीमुळे घाबरला आहे आणि ठिकाणावर येत आहे. यावरून अगदी स्पष्टपणे दिसतं की ‘आप’ हा एकमेव पक्ष आहे, जो भाजपशी लढू शकतो. ‘आप’ ने एकही आमदार नसताना गोव्याला सेवा देण्याचं वचन दिलं आहे, जे काँग्रेस 10 वर्षात करण्यात अपयशी ठरलं. सरकारने गेल्या 4 वर्षांपासून लोकांच्या गरजांकडे केवळ दुर्लक्ष केलं आहे, असं म्हांबरे म्हणालेत.

‘आप’ गोव्यात ताकदीने वाढतंय

‘आप’ गोव्यात ताकदीने वाढत आहे, यात कोणतंही रहस्य नाही. वीज आंदोलनापासून सुरुवात करून पक्षाने गोव्याच्या जवळजवळ प्रत्येक पंचायतीला भेट दिली आहे आणि केजरीवाल प्रशासन आदर्श गोंयकारांपर्यंत पोहोचलं आहे. गोंयकारांना याची जाणीव आहे, की केजरीवाल सरकार आपल्या नागरिकांना मोफत आरोग्य सेवा, वीज आणि पाणी पुरवतं. ज्यामुळे त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, की जर केजरीवाल हे करू शकतात, तर सावंत आणि भाजप सरकार का नाही? असं म्हांबरे म्हणालेत.

हेही वाचाः सिध्दी नाईक प्रकरणाची नव्याने चौकशी करा

सावंत सरकार गोंयकारांना मोफत सेवा पुरवण्यावर यू-टर्न घेणार

सावंत सरकार गोंयकारांना मोफत सेवा पुरवण्यावर यू-टर्न घेणार आहे. गोंयकारांना हे स्पष्टपणे आठवतं, की सावंत यांचे सहकारी नीलेश काब्राल यांनी गेल्या महिन्यातच ठामपणे सांगितलं होतं, की सावंत सरकार लोकांना कधीही मोफत सेवा देणार नाहीत. हे त्यांनी ‘आप’चे वीज मंत्री सत्येंद्र जैन यांच्याशी केलेल्या चर्चेत अभिमानाने सांगितलं होतं. सावंत सरकार मात्र सर्व बाजूंनी तीव्र निषेधाचा सामोरे जात असल्याचं दिसतंय, असा टोला म्हांबरेंनी लगावलाय.

हेही वाचाः CORONA UPDATE | चिंता वाढली! कोविड मृतांचा आकडा वाढला

केजरीवाल मॉडेलच गोव्याला वाचवू शकतं

मला आनंद आहे, की सावंत झोपेतून उठले आणि शेवटी त्यांनी कबूल केलं, की फक्त केजरीवाल मॉडेलच गोव्याला वाचवू शकतं. पण गोंयकर हुशार आहेत आणि त्यांना हे समजलं आहे, की सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी हे जाहीर करण्याचं एकमेव कारण म्हणजे ‘आप’पासून स्वतःला वाचवणं, असं म्हांबरे म्हणालेत.

हा व्हिडिओ पहाः Shocking Accident | CCTV | ….म्हणून रस्ता ओलांडताना नेहमी सतर्क राहावं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!