‘एफडीए’कडून मिठाईच्या दुकानांची तपासणी सुरू

चतुर्थीत ग्राहकांना भेसळयुक्त मिठाई मिळू नये याची दक्षता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: चतुर्थीला दोनच दिवस शिल्लक राहिल्यानं सध्या बाजारपेठा भरल्या आहेत. चतुर्थीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. मोदक, लाडू तसेच बर्फी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या अगोदरही अनेक वेळा भेसळयुक्त मिठाई सापडण्याच्या घटना घडल्या आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी अन्न औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील मिठाई दुकानांची तपासणी सुरू केली आहे.

हेही वाचाः अवघ्या 3 तासांत मुंबई-सिंधुदुर्ग हे अंतर पार करता येणार?

चतुर्थीत ग्राहकांना भेसळयुक्त मिठाई मिळू नये याची दक्षता

चतुर्थीच्या काळात भेसळयुक्त मिठाई ग्राहकांना मिळू नये यासाठी दुकानांची तपासणी सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चतुर्थी असल्याने अनेक मिठाईच्या दुकानाची तपासणी केली आहे. प्रशासानतर्फे उत्तर गोव्यातील २८ आणि दक्षिण गोव्यातील २४ मिठाईचे नमुने अन्न औषधी प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तापासण्यात आले आहे. तसंच अनेक दुकानांवर असलेल्या मिठाईची अवैधता आणि दर्जा तपासण्याचे काम सुरू आहे. लोकांना चांगल्या दर्जाची मिठाई चतुर्थीच्या काळात मिळावी यासाठी अन्न औषध प्रशासनातर्फे ही मोहीम हाती घेतली आहे.

पैशाच्या मोहापायी काही मिठाईवाल्यांकडून मिठाईमध्ये भेसळयुक्त पदार्थांची मिसळ

पैशाच्या मोहापायी अनेक वेळा काही मिठाईवाल्यांकडून मिठाईमध्ये भेसळयुक्त पदार्थ मिळविले जातात. मिठाई खूप दिवस टिकावी तसंच दिसायला चांगली दिसावी यासाठी काही रसायने त्यात मिळविली जातात. अशी मिठाई लोकांच्या जीवाला हानीकारक असून कॅन्सरसारखे रोग उद्भवू शकतात. यापूर्वी अनेकदा राज्यात असे प्रकार समोर आले आहे. गणेश चतुर्थी, दिवाळी अशा सणानिमित्त मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. अशा वेळी काही मिठाईवाल्यांकडून असं कृत्य केलं जात आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासन नजर ठेवून आहे.

हेही वाचाः एनसीबीची गोवा, मुंबईत मोठी कारवाई

निकृष्ट मिठाई सापडल्यास होणार कारवाई

राज्यात भेसळयुक्त मिठाई लोकांना मिळू नये यासाठी राज्यातील विविध दुकानांतून जमा केलेले मिठाईचे नमुने अन्न आणि औषध प्रशानाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले असून काहींची पाहणी अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. दुकानावरील मिठाईचा दर्जा तपासताना त्यात काही भेसळ आढळल्यास ती मिठाई नष्ट केली जाणार आहे. बाजारात कुठेही संशयास्पद मिठाई आढळली तर ग्राहकांनी खात्याला कळवावं, असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी केलं.

हा व्हिडिओ पहाः BJP | POLITICS | दामू नाईक यांचा पन्नासावा वाढदिवस थाटात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!