राज्याची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर? जीएमसीत गरोदर महिलेची क्रूर चेष्टा

जीएमसीतील धक्कादायक प्रकार समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : एका महिलेची प्रसुती जीएमसीमध्ये झाली असून तिचं बाळ सध्या आयसीयूमध्ये आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची क्रूर चेष्टा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या गरोदर महिलेला वॉर्डच्या बाहेर ताटकळत ठेवण्यात आल्याचा ठपका ठेवला जातोय. इतकंच नाही तर ही महिला परराज्यातील असल्यानं तिला अशापद्धतीनं वागणूक देण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. सदर महिलेची प्रसुती होऊन बाळाला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलंय. तोपर्यंत तिला बाहेरच बसवण्यात आल्याचा क्रुर प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

कुणी केला आरोप?

लिबी मेन्डोन्सा नावाच्या एका महिलेनं या सगळा प्रकार उघडकीस आणला आहे. या महिलेनं फेसबूक पोस्ट करत ही बाब सगळ्यांच्या निदर्शनास आणली आहे. सोबतच ज्या गरोदर महिलेसोबत हा सगळा प्रकार घडला, तिचे फोटोही या लिबी यांनी शेअर केले आहेत.

वॉर्ड क्रमांक १३१मध्ये एकही बेड शिल्लक नसल्यानं या महिलेला बाहेरच बसवण्यात आलं. अशातच या महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या. यानंतर या महिलेनं एका बाळाला जन्म दिला. मात्र तोपर्यंतचा काळ हा असह्य करणारा आणि राज्यातील आरोग्य यंत्रणेची मान शरमेनं खाली घालवणारा असल्याची टीका करण्यात आली आहे. या महिलेला देण्यात आलेली वागणूक कितपत योग्य होती, असा सवालही उपस्थित केला जातोय. जीएमसी रुग्णालयातील याप्रकारामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणाच कुठेतरी व्हेंटिलेटरवर आहे की काय, अशी शंका घेतली जाते आहे.

दरम्यान, याप्रकरणाबाबत आता जीएमसीतील प्रशासनकडून नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातं, हे पाहणंही महत्त्वाचंय. परराज्यातील आलेल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे.

This lady has delivered a baby n the new born is in ICU..The mother is made to stay outside as there r no beds in ward…

Posted by Liby Mendonca on Tuesday, 16 March 2021

हेही वाचा – भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी

हेही वाचा – कामाचे पैसे न दिल्यानेच घडलं दुहेरी हत्याकांड

नेमकी काय आहे घटना?

याच सगळ्या प्रकारावर आमचे प्रतिनिधी सचिन खुटवळकर यांनी लिबी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर, ज्यावेळी पीडित महिला उपचारासाठी रुग्णालयात आली तेव्हा तिला अडवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. नाव नोंदणी न केल्यामुळे या महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतरही जेव्हा या महिलेला प्रवेश देण्यात आला, तेव्हाही तिला बाकड्यावर बसवून ज्या पद्धतीनं वागणूक देण्यात आली, ती चिंताजनक असल्याचं लिबी यांनी म्हटलंय.

बाहेरची म्हणून असं करणार?

परराज्यातून येणाऱ्यांबाबत आधीच राज्यात वादग्रस्त प्रतिक्रिया वारंवर उमटत असताना आता या महिलेसोबत घडलेल्या प्रकारावरुनही नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. ही महिला परराज्यातील असल्यानं तिला उपचार आणि जीएमसीत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जर आता गोव्यातील महिला इतर कोणत्या राज्यात गेल्या आणि त्यांना अशाप्रकारे वागणूक मिळाली तर ते योग्य ठरणार का?, असा सवालही लिबी यांनी उपस्थित केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!