नितेश राणेंनी यासाठी केलं गोव्याच्या ‘सीएम’चं कौतुक!

पोस्टवरच्या कमेंटही तितक्याच इंटरेस्टिंग!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविडचे वाढते रूग्ण, संचारबंदी आणि त्यातच सुरू असणारी 100 कोटींच्या खंडणीची चर्चा यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला पहिल्यापासुनच धारेवर धरलंय.

उद्धव ठाकरे हे कोविड आटोक्यात आणण्यात अपयशी ठरले असल्याचं सांगतानाच त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं कौतुक केलंय. यासंदर्भात नितेश राणे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकलीय. गोवा छोटं राज्य असलं तरी जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी जाहिरातबाजी न करता मुख्यमंत्री डॉ. सावंत चांगलं काम करत असल्याचं सांगतानाच त्यांनी गोवा सरकारनं दिलेल्या होम आयसोलेशन किटचा उल्लेख केलाय. त्याचा फोटोही सोबत दिलाय.

हेही वाचा – प्रतापसिंह राणे : राजकारणातले पितामह

या पोस्टमध्ये ते म्हणतात,

एका मुख्यमंत्र्याची इच्छाशक्ती असेल तर तो आणि त्यांचे प्रशासन काय करू शकते ते पहा..
गोवा भलेही देशातील एक छोटे राज्य आहे, पण कोरोनाच्या लढाईत जनतेच्या खरंच काय अडचणी आहेत, हे समजून घेऊन त्या लोकांसाठी सर्व प्रकारची तयारी करून ठेवली आहे. ना ते केजरीवाल आहेत ना ते उद्धव ठाकरेंसारखे टीव्हीला आणि पेपरला व पीआर एजन्सीला जाहिरात देऊन पैसे खर्च करत बसले नाहीत आणि केंद्र सरकारच्या समोर हात पसरून उभे राहिले नाहीत. त्यांनी एक छोट्या प्रकारचे आयसोलेशन किट तयार केले आहे जे सामान्य लक्षणवाल्या कोरोना संक्रमित लोकांना वाटले आहेत. त्यामुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये न जाता घरीच स्वस्थ राहू शकतील.
जर गोवासारखं छोटे राज्य हे करू शकते तर महाराष्ट्र राज्य सरकार का नाही करू शकत? नुसती खंडणी गोळा करून मोकळे होणार.. फक्त हे काम करायला इच्छाशक्ती पाहिजे तरच सर्व काही शक्य आहे..

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच जाहीर केलेल्या जमावबंदी आणि अन्य सुविधांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असतानाच नितेश राणे यांच्या या फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.

एका मुख्यमंत्रीची इच्छाशक्ती असेल तर तो आणि त्यांचे प्रशासन काय करू शकते ते पहा… गोवा भलेही देशातील एक छोटे राज्य…

Posted by Nitesh Rane on Wednesday, 14 April 2021

कमेंटमधून नेटकऱ्यांनी सुनावलं!

दुसरीकडे नितेश राणेंनी केलेल्या गोवा मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर काहींनी त्यांच्या ‘हा’ मध्ये ‘हा’ मिळवली आहे. तर काहींनी मात्र खोचक टोलाही लगावलाय. गोव्यातच राहत असलेल्या अक्षय नावाच्या एका युजनं केलेली कमेंट या पोस्टवर भाव खाऊन गेली आहे. ते म्हणतात…

ओ राणे…..आम्ही पन गोव्यात राहतोय मरत आहोत आम्ही आमच्या आमच्या रूम मधे कही काळजी नही इथल्या सरकार ला कोणाला कोरोना असुदया किंवा नसूदयाकसीनो वाल्यानी धमकी दिली प्रमोद सावंत ला की locdown केल तर election ला funding केली जाणार नाही तुम्ही काय सांगता goa सरकार च कौतुक

तर आपल्या मतदारसंघातील लोकांना किट देण्याचा सल्ला सचिन जाधव नावाच्या एकानं नितेश राणेंना दिलाय. ते म्हणतात…

राणे साहेब त्या गोवा च्या CM नि त्याच्या राज्यत किट वाटले आहे तेवढे तुम्ही तुमच्या मतदार संघात वाटले तर बरे होईल.

हेही वाचा – राणेंना बेडूक म्हणणारे उद्धव हे दुसरे ठाकरे!

दुसरीकडे योगेश देशमुख नावाचे एख फेसबूक युजर कमेटमध्ये लिहितात की,

असच लाॅजीक लावायच असेल तर केंद्र सरकारने हे काम पहिल्या लाॅकडाऊन मध्येच केले असते तर ही वेळ आली नसती अजूनही वेळ गेलेली नाही सांगा आपल्या माननीय पंतप्रधानांना

हेही वाचा – दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

हेही वाचा – दोडामार्गवासीयांचा आदर्श, उभारली ‘माणुसकीची भिंत’

यात सगळ्यात महत्त्वाची कमेंट जी करण्यात आली आहे, त्याचा आम्ही फोटो इथे शेअर करत आहोत. जाणकार वाचकांसाठी तेवढंच पुरे..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!