फादर रॉजर गुदीन्हो यांचे सर्वांनाच खडे बोल

राजकारण्यांना सावध होण्याचा दिला इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ख्रिस्ती पुढाऱ्यांनो सावध राहा. तुम्ही देवाचा रोष पत्करलाय. याचा तुम्हा सर्वांना हिशेब द्यावा लागेल. सिकेरी येथील सेंट लॉरेन्स चर्चचे फादर रॉजर गुदीन्हो यांनी प्रार्थना सभेत गोव्याच्या सगळ्याच राजकारण्यांना खडे बोल सुनावलेत. त्यांचा हा संदेश सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झालाय.

हेही वाचाः गोव्यातील महिलांना कॅन्सर होण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त

नक्की काय म्हणालेत फादर?

स्वतःच्या फायद्यासाठी या राजकीय पक्षातून त्या राजकीय पक्षात माकड उड्या मारणाऱ्या राजकारण्यांना संबोधताना फादर म्हणालेत, सर्व गोंयकारांनी राज्यातील सर्व राजकारण्यांना एकच गोष्ट शिकवायची गरज आहे, चोरू नका. हे राजकारणी कुणाचाच विचार करत नाहीत. त्यांच्या ठायी कसलीच नैतिकता, मूल्य उरलेली नाही. आपल्या कृतीने कुणाला वाईट वाटतंय, कुणाचं नुकसान होतंय याचा विचार हे राजकारणी करत नाहीत. त्यांच्या ठायी देवाची भीती उरलेली नाही. म्हणून त्यांंचं या पक्षातून त्या पक्षात सारखं माकड उड्या मारणं सुरूच आहे. त्यामुळे गोंयकार बंधु-भगिनींनो, निवडणूकांच्या वेळी तुमच्याकडे मत मागण्यासाठी येणाऱ्या राजकारण्यांना एकच गोष्ट शिकवा, चोरू नका.

हेही वाचाः आतापर्यंतच्या कोविड बळींपैकी ६० टक्के मृत्यू हे एकट्या जीएमसीमध्ये!

सर्व राजकीय नेते चोर

क्षेत्रफळ, लोकसंख्या सगळ्या दृष्टीने गोवा अगदी छोटा आहे. या छोट्याशा गोव्यात एवढे राजकीय पक्ष कशासाठी? केवळ आपल्या स्वार्थासाठी या राजकारण्यांनी हे एवढे राजकीय पक्ष सुरू केलेत. येणाऱ्या काळात अजून नव्या राजकीय पक्षांचा उदय होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. हे सगळे पक्ष आणि त्या पक्षाचे नेते हे चोर आहेत, फक्त स्वतःचा स्वार्थ पाहणारे, असं म्हणत फारनी राजकारण्यांवर निशाणा साधलाय.

हेही वाचाः आज पहिला श्रावणी सोमवार! अशी करा पूजा…

राजकारण्यांनो, सावध रहा!

मी सर्व राजकारण्यांना एकच सांगू इच्छितो, की तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. सगळ्यांना देवासमोर लवकरच हिशोब द्यावा लागणार आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा देवाचा संदेश तुम्ही पाळलेला नाही. तुम्ही लोकांना त्रास दिला, कष्टी केलं, त्यांना फसवलं. यामुळेच आज गोवा दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करतोय. गोव्याकडे पैसा नाही. सरकारी इमारती मोडून पडल्यात. कारण सगळ्या राजकारण्यांनी स्वतःच्या पेट्या भरल्यात. कर्मा नावाचा एक संकल्पना आहे, जी प्रत्येक धर्माला लागू होते. त्यामुळे तुमचा हिशोब देण्यासाठी देव थांबलाय, यातून कुणाचीच सुटका नाही, तयार राहा, म्हणत फादरनी राजकारण्यांना इशारा दिलाय.

हा व्हिडिओ पहाः ख्रिस्ती पुढाऱ्यांनो सावध राहा. तुम्ही देवाचा रोष पत्करलाय- फादर रॉजर गुदीन्हो

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!