रॉय फर्नांडिस यांच्यावर जीवघेणा हल्ला

शनिवारी संध्याकाळची घटना; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः वेर्ला-बार्देश येथील रॉय फर्नांडिस यांच्यावर शनिवारी संध्याकाळी रोहन हरमलकर आणि इतर सहा जणांनी मिळून हल्ला केल्याची तक्रार रॉय रोझारिओ फर्नांडिस यांनी हणजुण पोलिसात नोंदवली आहे. तसंच त्या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर वायरल केला आहे. हल्ला करणारे संशयित हे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची माणसं असल्याचा आरोप रॉय फर्नांडिस यांनी केला आहे. हल्ल्यानंतर हे गंभीर जखमी आहेत.

हेही वाचाः भाजप मंडळ आंदोलन करणार, तर पेडणे ‘मगोप’चा पूर्ण पाठिंबा

कृष्णाच्या देवळाजवळ अडवलं

रॉय फर्नांडिस हे पेशाने एक व्यावसायिक ते कळंगुटमध्ये चाललेल्या डोंगर कापणीच्या निषेध करणाऱ्या गटाचं नेतृत्व करतायत. शनिवारी संध्याकाळी ते आपल्या एका मित्रासोबत वेर्ला-काणका इथून आपल्या कारने चालले होते. त्यावेळी रस्त्यात कृष्णाच्या देवळाजवळ मायकल लोबोंचा माणूस रोहन हरमलकर याच्यासह इतर सहा जणांनी अडवलं आणि आरपल्याला शिव्या घालू लागले. त्यांचा प्रतिकार केला असताना कळंगुटमधील डोंगल कापणीशी तुझा संबंध काय? असा प्रश्न करून ते आपल्या अंगावर धावून आल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

लोखंडी सळीने डोक्यावर केला वार

रोहन हरमलकर याने आपल्या पायावर, तर त्याच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या डोक्यावर लोखंडी सळीने वार केला. तसंच लोबोंच्या मार्गात न येण्याची धमकीही दिली. यानंतर आपण बेशुद्ध पडल्याचं फर्नांडिस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः तीन अर्भकांचा तपास अजूनही गुलदस्त्यात

पोलिसांत तक्रार दाखल

सदर प्रकारानंतर फर्नांडिस यांनी हणजुण पोलिस स्टेशनमध्ये या प्रकाराविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. हणजुण पीएस यांनी सीआर.क्र. 73/2021 अंतर्गत आयपीसीच्या कलम 34 अंतर्गत वाचण्यात येणाऱ्या 326, 341, 365, 506 (ii) अंतर्गत रोहन हरमलकर तसंच त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हणजुणचे पीएसआय महेश केरकर करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!