ACCIDENT | धारबांदोड्यात टेम्पो रिक्षा-दुचाकीमध्ये टक्कर

दुचाकीचालकाचा मृत्यू; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

धारबांदोडाः राज्यातील अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. रोज अपघातांच्या बातम्यांशिवाय दिवस सरत नाही. मंगळवारी धारबांदोड्यात एक रिक्षा आणि दुचाकीमध्ये जोराची टक्कर होऊन अपघात घडलाय. अपघात एवढा गंभीर होता की यात दुचाकीचालकाचा मृत्यू झालाय.

नक्की कुठे झाला अपघात?

धारबांदोडा तालुक्यातील पेटके इथे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळतेय. जीए06टी1731 या क्रमांकाची टेम्पो रिक्षा आणि दुचाकी यांची आपापसात जोराची टक्कर झाल्याने दुचाकीस्वाराला जागीच मरण आलं. दोन्ही वाहनं ही उसगावच्या दिशेने येत होती. दरम्यान टेम्पो रिक्षाने दुचाकीला पाठीमागून ठोकल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती मिळतेय. अपघातातील जखमी दुचाकी चालकाला तातडीने धारबांदोड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सकडून दुचाकी चालक मृत झाल्याचं सांगण्यात आलं.

उसगावातील व्यक्तीचा अपघातात मृत्यू

मकबूल बादशा दस्तगीर साहब तमोती या दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू झाला. दुचाकी चालक हा उसगाव भागातील असल्याची माहिती मिळालीये. आपल्या एका कामानिमित्त ते चालले असताना वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातलाय.

अधिक तपास सुरू

मात्र हा अपघात कसा घडला, कोणाच्या चुकीमुळे घडला हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अपघातानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघात झालेल्या स्थळाची पहाणी केली आहे. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी टेम्पो रिक्षा चालक राहुल दामोदर गोसावी याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!