ACCIDENT | मडगावात कारचा अपघात

मंगळवारी सकाळची घटना; एकाचा जागीच मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः राज्यात अपघाताचं सत्र दिवसेंदिवस वाढतंय. त्याचप्रमाणे अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसतेय. सोमवारी सकाळी वेर्णा येथील अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी मडगावात एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाला जारीच मरण आलंय.

कुठे झाला अपघात?

मडगावात मंगळवारी अपघात होऊन एकाचा मृत्यू होण्याची घटना घडलीये. मडगावातील रावणफोंड येथे एमईएसच्या शेजारी हा जीवघेणा अपघात घडलाय. यात एका कारने पार्क केलेल्या रिक्षा आणि स्कूटरला धडक दिल्याचं समजतंय.

कसा झाला अपघात?

हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी कार चालक भरधाव वेगात आला. त्याने एमईएसच्या जवळ रस्त्याच्या शेजारी पार्क केलेल्या रिक्षा आणि स्कूटरला धडक दिली. कारवरील त्याचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं बोललं जातंय. मात्र नक्की कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

एकाचा मृत्यू

सदर अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. रिक्षा तसंच स्कूटर पार्क केलेले असल्याने त्यांचे चालक त्यावेळी तिथे अनुपस्थित होते. त्यामुळे ते सुखरूप आहेत. मात्र कार चालकाचा बळी गेलाय. तसंच कारचंही मोठं नुकसान झालंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात १०२ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तिथे तातडीने हजर झाले. त्यांनी पंचनामा करून मृताचे शव हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. पुढील रिपोर्ट्स आल्यानंतरच अपघाताचं नक्की कारण काय ते समजू शकेल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!