Top 25 | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

बातम्यांचा झटपट आढावा एका क्लिकवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला, नवे दर सोमवारपासून लागू, इंधनापाठोपाठ गॅसच्या किंमतीही भडकल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

राज्याचा बेरोजगारी दर २१ टक्क्यांवर

राज्याचा बेरोजगारी दर २१ टक्क्यांवर, बेकारीमध्ये गोवा फेब्रुवारीत तिसऱ्या क्रमांकावर, एचआरडीतील ७५० नोकऱ्यांसाठी हजारो अर्ज

सत्तरीतील धबधबे पर्यटकांसाठी बंद

सत्तरीतील धबधबे पर्यटकांसाठी बंद, १ मार्चपासून धबधब्यांवर बंदी, वन खात्याचा निर्णय, धबधब्यांवरील मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं खबरदारीचा निर्णय

तरुण तेजपाल खटल्याची सुनावणी गुरुवारपासून

सोमवारपासून सुरु होणारी तरुण तेजपाल खटल्याची सुनावणी गुरुवारपासून सुरु होणार, ४ मार्चपासून सुरु होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष

राज्य सरकार, निवडणूक आयोगाला दणका

पाच नगरपालिकांच्या निवडणूक आरक्षणाची अधिसूचना अखेर रद्द, हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, 10 दिवसांत नवी अधिसूचना काढून नव्याने निवडणूक जाहीर करण्याचे आदेश, मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपेत नवे आरक्षण.

हायकोर्टाच्या निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान

पाच नगरपालिकांच्या आरक्षणाची अधिसूचना रद्द करण्याचा हायकोर्टाचा निवाडा राज्य सरकारला अमान्य, निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान.

राज्य सरकारवर विरोधकांची सडकून टीका

नगरपालिकांच्या आरक्षणातील घोळावरून हायकोर्टानं झापल्यानंतर विरोधकांची राज्य सरकारवर टीका, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे सुदिन ढवळीकर, काँग्रेसचे संकल्प आमोणकरांनी साधला निशाणा.

नमाज पठणासाठी जायचं कुठे?

पणजी महापालिकेनं घेतला सांतिनेजच्या मुस्लिमांशी पंगा, नमाजाची पर्यायी शेड मोडल्यानं मुस्लिम बांधवांची गैरसोय, महापौरांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानं नाराजी.

म्हादई आटली, कर्नाटकनं गळा घोटला

इतिहासात पहिल्यांदा आटली म्हादई नदी, कर्नाटकनं म्हादई संपवल्याचा राजेंद्र केरकरांचा आरोप, पाण्यासाठी गोव्याची कोंडी करण्याचा कर्नाटकचा कट.

मोपा विमानतळाविरोधात स्थानिक आक्रमक

मोपा विमानतळाविरोधात स्थानिकांची निदर्शनं, घोषणाबाजी करत स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध, तुळसकरवाडी आणि नागझरमधील स्थानिक आक्रमक.

Mopa Issue | मोपा विमानतळ आणि हायवेविरोधात तीव्र निदर्शनं आमची जमीन आमकां जायचा नारा

पायलटांसाठीची पेन्शन योजना पूर्ववत करा

आधी लॉकडाऊन आणि आता इंधन दरवाढीमुळे राज्यातील मोटारसायकल पायलट अडचणीत, पायलटांसाठीची पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याची राज्य सरकारला विनंती.

कोरोना लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात

देशभर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांनी घेतली लस, राज्यातही ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण.

आसगावात साईबाबा घुमटीची मोडतोड

सोनारखेड आसगावात अज्ञाताकडून साईबाबा घुमटीची मोडतोड, हणजूण पोलिसांनी केला पंचनामा.

गोव्याच्या किनार्‍यावर गायत्री दातारची धमाल

गोव्याच्या किनार्‍यावर गायत्री दातारची धमाल, व्हेकेशननिमित्त गायत्री आली गोव्यात, किनार्‍यावर धमाल करतानाचे फोटो व्हायरल.

देवेंद्र फडणवीस-अजित पवारांमध्ये जुंपली

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठिणगी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अजित पवारांमध्ये जुंपली, विदर्भ-मराठवाड्यासाठी भीक मागत नसल्याची फडणविसांची टीका.

राहुल गांधींचं पुशअप्स चॅलेंज वायरल

राहुल गांधींचं पुशअप्स चॅलेंज वायरल, तामिळनाडूतील एका शाळेच्या कार्यक्रमात केलेलं पुशअप चॅलेंजचा व्हिडीओ राहुल गांधीनी केला शेअर

पाच कोटी दिल्याचा पूजाच्या आजीचा आरोप

महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोडांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटींची रक्कम दिली, पूजाची चुलत आजी शांता राठोडांचा आरोप, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन वादंग कायम.

शार्दुल ठाकुरची तुफान फटकेबाजी

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात शार्दुल ठाकूर चमकला, तुफान फटकेबाजी करत मुंबईचा डाव सावरला, अवघ्या ५७ बॉल्समध्ये कुटल्या ९२ धावा, थोडक्यात शार्दुलचं शतक हुकलं

मुंबईतील आयपीएल सामने प्रेक्षकांविना?

आयपीएल स्पर्धेतील सामने चार शहरांत खेळविण्यावर शिक्कामोर्तब, मात्र मुंबईतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळविण्याचा निर्णय शक्य, बीसीसीआयकडून सर्व शक्यतांची पडताळणी.

विनेश फोगाटची सुवर्ण कामगिरी

कुस्तीपटू विनेश फोगाटचं दणक्यात पुनरागमन, कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटची सुवर्ण कामगिरी

जीएसटीमधून केंद्र सरकारची घसघशीत कमाई

जीएसटीमधून केंद्र सरकारची घसघशीत कमाई, सलग तिसर्‍या महिन्यात एक ट्रिलियन रुपये जमा, फेब्रुवारीमध्ये जमा झाला 1.13 ट्रिलियन रुपये जीएसटी महसूल.

नवीन राजकीय पक्ष स्थापण्यास ट्रंपचा नकार

व्हाईट हाऊस सोडल्यानंतर पहिल्यांदा दिसले डोनाल्ड ट्रंप, नवीन राजकीय पक्ष स्थापण्यास दिला नकार, जो बायडन यांच्यावर साधला निशाणा.

नासाच्या यानाचं भारतीयाकडून नियंत्रण

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या मंगळ मोहिमेतील पर्सिव्हिअरन्स रोव्हरचं नियंत्रण भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाच्या हातात, संजीव गुप्ता पाहतात पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या नियंत्रणाचं काम.

पाकिस्तानकडून 17 भारतीय मच्छीमारांना अटक

पाकिस्तानच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपातून 17 भारतीय मच्छिमारांना अटक, तीन बोटीही जप्त, पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिली भारतीय यंत्रणेला माहिती.

करिश्मा कपूरचा फिटनेस चर्चेत

बॉलिवूडपासून दुरावलेली अभिनेत्री करिश्मा कपूरचा फिटनेस चर्चेत, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत दिसून आला तरुणींना लाजवणारा फिटनेस, फोटो व्हायरल.

राहुल गांधी काढली, स्वरा भास्कर काढली, महाराष्ट्र कोरोना काढली, महाराष्ट्र वाळू शिल्प काढलं, मुंबईची बत्ती गुल चीन काढली, व्हीव्हीयन रिचर्ड काढली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!