मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा; ऊस उत्पादक आक्रमक…

न्यायालयात जाण्याच्या हालचाली : कारखानास्थळी शेतकऱ्यांची बैठक

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी पुन्हा एकदा मुदत देऊन मागण्या पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे. विविध मागण्यांबरोबरच साखर कारखाना सुरू करण्याचे स्पष्ट धोरण जाहीर न केल्यास ६ डिसेंबर रोजी कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादकांनी गुरुवारी दिला. ‘संजीवनी’च्या जागेसंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत ऊस उत्पादकांनी विचारविनिमय सुरू केला आहे. 
हेही वाचाःप्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण…

कारखान्याच्या गेट समोर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय

संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी विविध मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी प्रशासकाला निवेदन सादर करून २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार गुरुवारी ऊस उत्पादकांनी कारखान्यासमोर एकत्र येऊन चर्चा केली. प्रशासक कार्यालयात नसल्याने दुपारी २ पर्यंत प्रशासकांना येण्याचा संदेश देण्यात आला होता. परंतु प्रशासक संध्याकाळपर्यंत कार्यालयात आलेच नाहीत. ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनंतर ६ डिसेंबर रोजी कारखान्याच्या गेट समोर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.     
हेही वाचाःरोहित कदम नवे क्रीडा संचालक… 

५ वर्षे वेळोवेळी नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता

ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले, ऊस उत्पादकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. नुकसान भरपाईबाबत सरकारने नवीन आदेश जारी केल्याने अनेक ऊस उत्पादक संकटात सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनुसार ५ वर्षे वेळोवेळी नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. ऊस उत्पादक रस्त्यावर उतरल्यानंतरच सरकार जागे होते. मागण्या पूर्ण न झाल्यास ६ डिसेंबर रोजी ऊस उत्पादक कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन करतील, असा इशाराही देसाई यांनी दिला. 
हेही वाचाःनायजेरियन नागरिकांवर धारदार हत्याराने हल्ला, चौदा संशयित आरोपमुक्त…

कायदेशीर सल्ला घेऊनच याचिका दाखल केली जाणार

या बैठकीत संजीवनीच्या जागेसंबंधीही चर्चा करण्यात आली. ऊस उत्पादक संजीवनीचे सभासद असून सरकार त्यांना विश्वासात न घेता जागा वितरित करण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात न्याय मागण्याचा निर्णयही घेण्यात आला. कायदेशीर सल्ला घेऊनच याचिका दाखल केली जाणार आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी ऊस उत्पादक संजीवनी कारखान्याच्या आवारात चर्चा करत असताना कर्जबाजारी झालेल्या एका ऊस उत्पादकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर ऊस उत्पादक केपे येथील असून आणखीन कित्येक जण कर्जबाजारी झाल्याने बँकेचे अधिकारी वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावत आहेत.
हेही वाचाःविक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!