शेतकरी देशाचा कणा

आमदार दयानंद सोपटेंचं प्रतिपादन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः कोरोना काळात अन्नदात्याने आम्हा सर्वांना तारलं आहे. करोडपती, उद्योग-व्यावसायिकांकडे अमाप पैसा आहे. पण त्यांनाही शेवटी अन्नदाताच पोचला. शेतात पिकवलेल्या अन्नातून हा उद्योगपतीबरोबरच सर्वसामान्य नागरिक सुखाने दोन घास खाऊ शकला. त्यामुळे शेतकरीच खरा देशाचा कणा असल्याचं प्रतिपादन आमदार दयानंद सोपटेंनी मांद्रे मतदारसंघातील गरजू शेतकऱ्यांना मोफत भात आणि खतांचं वितरण करताना केलं.

हेही वाचाः शेती हा शेतकऱ्यांचा श्वास

2850 शेतकऱ्यांना मोफत भात, बियाणी, खत वाटप

आमदार सोपटेंनी गेल्यावर्षी 2050 गरजू शेतकऱ्यांना मोफत 50 किलो खत आणि बियाणी वितरीत केली होती. यंदा त्यात वाढ करून 2850 गरजू शेतकऱ्यांना सोपटेंनी मदतीचा हात दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. भात, बियाणी आणि खतांचं वापट करण्यासोबतच आता शेती नांगरणीसाठी आणि मळणीसाठी आधुनिक यंत्रे उपलब्ध करून शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प सोपटेंनी केला आहे.

हेही वाचाः हवामानातील समतोलपणा राखण्यासाठी झाडं लावणं गरजेचं: श्याम साखळकर

शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी आमदारांकडून मदत

मांद्रे मतदारसंघातील शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सोपटेंकडून गरजू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात देण्यात येतोय. मरडीवाडा मोरजी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच वैशाली शेटगावकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष नयनी शेटगावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचाः होंडा औद्योगिक वसाहतीमधील खराब गटार अवस्थेचा वाहनचालकांना त्रास

शेतीतून क्रांती करूया

शेतकरी अन्नदाता हा देशाचा महत्त्वाचा घटक आहे. तो जगला पाहिजे. शेतकऱ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला हवा, असं सांगून शेतीतून क्रांती करूया असं आमदार सोपटे म्हणालेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच

आमदार शेतीला प्राधान्य देणार

आमदार दयानंद सोपटे हे मागच्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहे. या कोरोना काळात शेतकऱ्यांची गरज ओळखून सोपटेंनी मदत कार्य केल्यानं शेतकऱ्यांनी त्यांच्या पडीक जमिनी पुन्हा कसवण्याचा प्रयत्न केला आहे. या पुढे शेतकऱ्यांना आमदार प्राधान्य देणार आहेत, असं मोरजीच्या सरपंच वैशाली शेटगावकर यांनी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः कोरोना लाटेत कामापेक्षा श्रेय लाटण्यावर केंद्राचा ‘डोळा’!

आमदारांना पुन्हा निवडून आणुया

गरीब शेतकऱ्यांचा आमदारांना कळवळा आहे. म्हणूनच ते अडल्यानडलेल्यांच्या मदतीसाठी पुढे धावतात. या पुढे पाच वर्षांसाठी ते शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा आमदार करुया, शेतकऱ्यांना आपण 100 टक्के आपला पाठिंबा द्यायला हवा, माजी सरपंच धनंजय शेटगावकर बोलताना म्हणाले.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!