प्रसिद्ध साहित्यिक नलिनी देशपांडेंचं निधन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
पणजीः सुप्रसिद्ध साहित्यिक नलिनी देशपांडेंचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती, मुलगा, दोन मुली, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.
साहित्य क्षेत्रात योगदान
नलिनी देशपांडेंनी वयाच्या 60 वर्षी लेखनाला सुरुवात केली. गोव्यातील अनेक दैनिकांमधून त्यांनी सातत्यानं लेखन केलं. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन केलं. दिवाळी अंकातील त्यांच्या काही कथा बक्षीसपात्रही ठरल्या होत्या.
अनेक पुस्तकं प्रकाशित
नलिनी देशपांडेंच्या नावावर २ कादंबर्या, ४ कथासंग्रह, २ ललित संग्रह आणि 1 कवितासंग्रह अशी 9 पुस्तकं आहेत. त्यांचा पहिला ‘पैठणी’ हा कथासंग्रह 2006 साली प्रकाशित झाला. त्यानंतर ठराविक कालांतराने त्यांची पुस्तकं प्रकाशित होत राहिली. ‘पैठणी,’ ‘ऋणानुबंध,’ ‘कन्यादान,’ ‘मनस्विनी’ हे चार कथासंग्रह, ‘जयहिंद मास्तर’ आणि ‘मानसकन्या’ या दोन कादंबर्या, ‘सोनेरी क्षण,’ ‘घरटं’ हे दोन ललित संग्रह, तर ‘हुंकार’ हा काव्यसंग्रह ही पुस्तकं प्रकाशित झालीत.