खळबळ! मुख्यमंत्र्यांच्या नावे तयार केली बनवाट फेसबुक आयडी; मागितले पैसे

फेसबुकवरील फेक आयडींना बळी पडू नका; गोवा पोलिसांचं जनतेला आवाहन

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः दररोज मोबाईलवकर कोणतं ना कोणतं कारण सांगून पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता फेसबुकवरही फेक आयडी तयार करून पैसे उकळण्याचं प्रमाण वाढलंय. फेक फेसबुक आयडी तयार करून पैसे उकळण्याची विविध प्रकरणं समोर येत असताना कुणीतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचाच फेक अकाऊंट तयार करून म्हापशातील प्रवीण आसोलकर यांच्याकडून चक्क 30 हजार मागितलेत.

मेसेज करून मागितले 30 हजार

प्रवीण आसोलकर यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नावाच्या आयडीवर फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट कन्फर्म केल्यानंतर फेसबुकवर मेसेजीस येऊ लागले. सुरुवातीला ‘हाय, हाव आर यू’ म्हणत चौकशीचा मेसेज आला. पुढे ‘तुझ्याकडे फोन पे किंवा गुगल पे आहे का?’ असं विचारलं गेलं. प्रवीण आसोलकरांनी होकारार्थी उत्तर देताच 30 हजार रुपयांची मागणी करणारा मेसेज आला. ‘मला तातडीने 30 हजार रुपयांची आवश्यकता आहे. मी 2 तासात तुझे पैसे परत देईन’ असं सांगून एक मोबाईल नंबर पाठवला आणि त्यावर लगेच पैसे पाठवण्याची विनंती केली गेली.

प्रवीण आसोलकरांची चलाखी

मात्र प्रवीण आसोलकरांनी ‘तू अगोदर मला 10 हजार पाठव’ असा रिप्लाय केला. त्यानंतर त्या अकाऊंटवरून मेसेजीस येणं बंद झालं. आसोलकरांनी दाखवलेल्या चलाखीमुळे त्यांचं नुकसान होण्यापासून वाचलं. फेसबुक फेक अकाऊंट्सना कधीच बळी पडू नका. पैसे मागणारे मेसेजीस आल्यास पोलिसांत कळवा किंवा ज्याच्याकडून मेसेज आलाय त्याला फोन करून खात्री करून घ्या, असं आवाहन प्रवीण आसोलकरांनी केलंय.

खोट्या शॉपिंग वेबसाईटवरून होते फसवणूक

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन खरेदीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारचे पेमेंट ऑनलाईन करण्यावर भर दिला. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खोट्या शॉपिंग वेबसाईट तयार करण्यावर भर देत आहेत.

हेही वाचाः कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस सत्तेत येणार नाही!

ही काळजी घ्यावी

कोणत्याही संशयित लिंकवर क्लीक न करणं, अनोळखी ई-मेलच्या अटॅचमेंट फाईल डाऊनलोड न करणं, कोणत्याही बेवसाईटला भेट देताना वेबसाईट स्पेलिंग पुन्हा-पुन्हा तपासणं, फेसबुक अकाऊंटवरून मित्रांचा मेसेज आल्यास फोन करून खात्री करणं अशी सगळी काळजी घ्यावी.

हेही वाचाः पल्लवी भगतांचा अपमान हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान

फसवणूक होताच पोलिसांत कळवा

नागरिकांनी सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये, तरीही अशी फसवणूक झाली वा होण्याची शंका येताच पोलिसांना कॉल करून माहिती द्यवी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!