देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गोव्यात येणार व्हाया सावंतवाडी

भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडी : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावंतवाडी येणार आहेत. यानंतर ते गोव्यातही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. कोल्हापूर गोवा दौऱ्यादरम्यान ते भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं कळतंय.

देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचे युवा नेते नितेश राणेही सावंतवाडीत दाखल झालेत. आमदार राणेंचं नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय.

सावंतवाडीतील कार्यक्रम झाल्यानंतर गोव्यातीलही भाजप कार्यकर्त्यांसोबत देवेंद्र फडणवीस संवाद साधणार असल्याची माहिती मिळतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!