मोठी बातमी | सत्तरीत आयआयटी नकोच! Facebook LIVE द्वारे विश्वजीत राणेंचा संदेश

मुख्यमंत्र्यांना विश्वजीत राणेंची हात जोडून विनंती

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या दहा दिवसांपासून गाजणाऱ्या आयआयटीविरोधात आंदोलनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शेळ-मेळावलीतील आयआयटीविरोधाला आता विश्वजीत राणेंनीही पाठिंबा दिला आहे. भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री असणाऱ्या विश्वजीत राणेंच्या मतदारसंघातील शेळ-मेळावलीत प्रस्तावित आयआयटीला गेल्या काही दिवसांपासून विरोध वाढतोय. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी दुपारी फेसबुक लाईव्ह करत आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी आयआयटी सत्तरीत नकोच, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले विश्वजीत राणे?

आयआयटीचा विकास प्रकल्प चांगला जरी असला तरी माझ्या मतदारसंघातील लोकांचा जर या प्रकल्पाला विरोध आहे, तर मला त्यांच्या बाजूनं उभं राहावंच लागेल, असं विश्वजीत राणेंनी म्हटलं आहे. हा विरोध पाहता सत्तरीत आयआयटी नको, असं वक्तव्य फेसबुक लाईव्हद्वारे आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. तसंच गावकऱ्यांना नोंदवण्यात आलेल्या तक्रारीही मागे घेतल्या जाव्यात अशीही मागणी विश्वजीत राणे यांनी केली आहे. दुसरीकडे त्यांनी महिलांवर हात उगारणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली. महत्त्वाचं म्हणजे आयआयटीचा प्रकल्प सत्तरी करु नये, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पाहा व्हिडीओ –

अचानक फेसबुक लाईव्ह

अचानक फेसबुक लाईव्ह करत आरोग्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, कालही विश्वजीत राणेंनी ट्वीट करत मेळावलीवासीयांच्या भुमिकेसोबत आपण असू, अशा आशयाचा संदेश दिला होता. त्यानंतर त्यांनी फेसबुक लाईव्ह करत शेळ-मेळावलीतील आयआयटीविरोधात भुमिका घेतली आहे.

मेळावलीवासीयांना वाढता पाठींबा

दुसरीकडे मेळावलीतील लोकांना पाठिंबा वाढतोय. सत्तरीतील अनेक गावं मेळावलीवासीयांच्या सोबतीला आली असून त्यांनीही आयआयटीला विरोध दर्शवला आहे. गेले दोन दिवस हा पाठिंबा वाढत असून यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. दुसरीकडे सरकारमधीलच वरीष्ठ मंत्री असलेल्या विश्वजीत राणेंनीही आयआयटी नको अशी भूमिका घेतल्या मुख्यमंत्र्यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

नेमकं विश्वजीत राणे काय म्हणालेत, ते ऐका – पाहा व्हिडीओ

हेही वाचा – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे अस्वस्थ झाले आणि…

मुख्यमंत्री EXCLUSIVE | पाहा मेळावलीवासीयांच्या वृत्तीवर मुख्यमंत्री सावंत म्हणाले की…

‘आयआयटी व्हावी ही पर्रीकरांची इच्छा’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!