फेसबुकवर जपून! शिकारी खुद जहाँ शिकार हो गया… कसं ते वाचा!

लग्नाच्या आमिषानं गंडवलं, संशयिताला दावणगिरीतून अटक, सायबर सेलची कारवाई

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजीः सिंगल अँड रेडी टू मिंगल आहात, आणि फेसबुकवर आपला जोडीदार शोधत आहात तर खबरदार. कारण फेसबुकवरून लग्नाचं आमिष दाखवून तब्बल २३ लाखांना लुटण्याचा प्रकार समोर आलाय. सायबर सेलनं या प्रकरणी स्वप्नील नाईक या तरुणाला अटक केलीय. असेच स्वप्नील नाईक तुमच्याही अकाऊंटवर, तुमच्या फ्रेंड्सलिस्टमध्ये असू शकतात. नेमकं काय घडलंय वाचा…

कसं फसवलं


स्वप्नील नाईक यानं एका महिलेच्या नावानं बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून तरुणांना आपल्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. लग्नासाठी आतूर असलेल्या एका तक्रारदारनं स्वप्नीलला तरुणी समजून तिची फ्रेंड्स रिक्वेस्ट मंजूर केली. हळूहळू दोघांची मैत्री वाढली, तिच्याशी लगट केली. दोघांमध्ये गट्टी जमली आणि तक्रारदार स्वप्नीलच्या जाळ्यात अडकला.

काय आहे मोडस ऑपरेंडी

स्वप्नील शाळा अर्धवट सोडलेला विद्यार्थी असून, त्यानं यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांसाठी कुडचडे पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा अटक केलीय. फेसबुकवर तरुणीच्या नावानं बनावट प्रोफाईल तयार करून इच्छुक तरुणांना जाळ्यात ओढण्याचं काम तो करत असे. तरुणांची खासगी माहिती मिळवून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम तो करायचा.

कशी झाली अटक

अशाच प्रकारे सात फेरे घेण्याचं आश्वासन देऊन स्वप्नीलनं तब्बल तक्रारदाराला २३ लाखांना लुटलं. आपण गंडवलो गेलोय हे लक्षात येताच तक्रारदारानं यासंबंधीची तक्रार सायबर सेलकडं नोंदवली. सेलनं यासंबंधी अधिक तपास केला असता संशयित स्वप्नीलचा वावर दावणगिरी-कर्नाटक इथं असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केलंय.

खबरदारी घ्या


फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून युझर्सनां गंडवण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. यामुळं फेंड्स रिक्वेस्ट मंजूर करण्यापूर्वी खातरजमा करून घ्या. ओळख नसलेल्या एखाद्या सुंदर तरुणीचा फोटो असलेलं प्रोफाईल असो किंवा एखाद्या हिरोईनचा मादक फोटो असलेल्या व्यक्तीशी ओळख नसताना मैत्री करू नका. कोणतीही शंका आल्यास सतर्क होऊन आपली वैयक्तिक माहिती देणं टाळा. आपली प्रायव्हसी मेंटेन करा आणि कोणताही धोका दिसून आल्यास त्वरित पोलिस स्थानकाशी संपर्क साधा. वरना आप भी शिकार हो सकते हो भिडू…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!