CARFEW | राज्यव्यापी कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढवला

आवश्यक सेवा राहणार सुरू; फार्मसी-रेस्टॉरंट्स किचन स. 7 ते सायं. 7 पर्यंत सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने 9 मे पासून राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा केली होती. हा कर्फ्यू 23 मे पर्यंत असणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र रविवारी 23 मे रोजी राज्यव्यापी कर्फ्यूचा कार्यकाळ वाढवला असून आता हा कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढवला असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्य लक्षात घेऊन कर्फ्यूचा हा कार्यकाळ वाढवला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हा व्हिडिओ पहाः आरोंदा न्हंयबाग पुलावर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राचा फज्जा

रविवारी संध्याकाळी जारी केला आदेश

जिल्हा प्रशासनाने रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात पंधरवड्याचा राज्यव्यापी कर्फ्यू 31 मे 2021 च्या सकाळी 7 पर्यंत वाढवला असल्याचं सांगितलंय. राज्याच्या किनारपट्टीवरील भागात कोविड-19 च्या संसर्गात वाढ झाल्यानंतर सुरुवातीला 9 मे रोजी पंधरवड्यासाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती.

अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

सरकारी अधिसूचनेनुसार, अत्यावश्यक नसलेली दुकाने या कर्फ्यूच्या कालावधीत बंद असणार आहेत. तर किराणा दुकानांसह आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या स्टोअर्सना सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत खुले राहण्याची परवानगी आहे. फार्मसी तसंच रेस्टॉरंट किचन यांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!