उशिरा का होईना ट्विट केलंच! गोंयकरांनो कर्फ्यू वाढवलाय बरं का!

इथे वाचा, नेमकं काय काय सुरु आणि काय काय बंद!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : दर आठवड्याच्या शुक्रवारी किंवा शनिवारी मुख्यमंत्री न चुकता कर्फ्यू वाढवल्याची माहिती आपल्या ट्वीटमधून राज्यातील जनतेला देत होते. यंदा मात्र शुक्रवारी किंवा शनिवारीही ट्वीट न आल्यानं आता कर्फ्यू पूर्णता शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण तसं झालेलं नाही. उशिराने का असेना, मुख्यमंत्र्यांनी कर्फ्यूबाबत ट्वीट केलंय. पुन्हा एकदा कर्फ्यू सात दिवसांनी वाढवलाय. यावेळी निर्बंध मागच्या वेळेसारखेच असणार आहेत.

दरम्यान, रविवारी राज्यात कोरोनामुळे १२० नवे रुग्ण आढळून आलेत. तर २१९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंदही रविवारी करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ही आता १६००च्या आत आली आहे.

दिल्लीला जाताना निरोप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत रविवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले होते. या वेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्फ्यूमध्ये वाढ करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र याबाबत त्यांनी ट्वीट केलेलं नव्हतं. त्यामुळे कर्फ्यू नेमका कसा असणार, याबाबतही संभ्रम होता. अखेर मागच्या ७ दिवसांत असलेल्या निर्बंधांप्रमाणेच कर्फ्यू पुढचे ७ दिवसही लागू असणार आहे.

राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 7 दिवसांनी कर्फ्यू वाढवण्यात आला असून आता २६ जुलै पर्यंत कर्फ्यू वाढवत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, कर्फ्यूमध्ये जरी वाढ करण्यात आली असली, तरी दुकानांसोबत आता व्यायामशाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला दिलासा देण्यात आला होता. तो यावेळीही काम आहे. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांबाबतही अल्पशा प्रमाणात ढिलाई देण्यात आली आहे.

काय दिलासा?

राज्यात मागच्या दोन्ही वेळेला कर्फ्यूमध्ये वाढ करताना दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या होत्या. यंदाही दुकानांच्या वेळेमध्ये वाढ केली जाण्याचं सत्र कायम आहे. आता राज्यातील दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा असणार आहे. त्यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यातील रुग्णवाढ कमी होत असल्यानं राज्यातील दुकानदारांना दिलासा देण्यात आलाय. राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये वाढ करत असल्याची घोषणा करताना आता राज्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली ठेवण्यात परवानगी असणार आहे.

दुकानांसोबतच आता व्यायामशाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही खुली करण्यात आली आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जावं यासाठी व्यायामशाळआ आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवावीत, अशी मुभा देण्यात आली आहे. त्यासोबतच धार्मिळ स्थळं ही फक्त 15 माणसांच्या उपस्थितीतच खुली ठेवावीस, असेही निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजाराच्या आत आल्यामुळे आता अधिक प्रमाणात कर्फ्यूमध्ये ढिलाई दिली जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!