Video | बघाच! मेळावलीत पोलिसानं महिलेच्या पोटावर पाय दिला?

Goan Varta Live | प्रतिनिधी
मेळावली : राज्यातील सत्तरी तालुक्यातील मेळावलीमधील आयआयटीविरोधी आंदोलनानं बुधवारी उग्र रुप धारण केलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच जुंपली होती. मोठ्या संख्येनं पोलिस मंगळवारप्रमाणेच बुधवारीही मेळावलीमध्ये दाखल झाले होते. आरेखनाच्या कामात अडथळा आणत असल्याचा ठपका ठेवत मेळावलीतील आंदोलकांना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. हे आव्हान पेलत असताना पोलिसांनी योग्यप्रकारे आपली भूमिका वढवली का, हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
आंदोलकांच्या पोटावर पाय
सुरुवातीपासून मेळावलीतील महिला मोठ्या संख्येनं आयआयटीविरोधातील आंदोलनात दिसून येत आहेत. या महिला आंदोलकांना रोखण्याच्या प्रयत्नता असलेल्या एका पोलिसानं तर चक्क महिलेच्या अंगावरच पाय देत पुढे चाल केल्याचं दृश्यातून भासतंय. यानंतर संपूर्ण मेळावतीली आंदोलक आणि पोलिसांमध्ये जुंपली होती. पोलिसानं केलेला हा प्रकार आंदोलकांची दडपशाही असल्याचा आरोप केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण घटनेची दृश्य गोवनवार्ता लाईव्हच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर महिला आंदोलकांनी वाळपई पोलिस स्थानकाकडे धाव घेतली. तिथे त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. पीआय सागर एकोस्करांच्या निलंबनाची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. इतकंच काय, तर मुख्यमंत्र्यांनी वाळपईमध्ये येऊन आमच्याशी चर्चा करावी, या मागणीवर आंदोलक ठाम होते.