EXCLUSIVE | नारायण राणेंचा ‘तो’ फोन मुख्यमंत्र्यांनाच, वाळू वाहतुकीवर मोठं विधान, म्हणाले…

महाराष्ट्रातील वाळू वाहतुकीला कायदेशीर परवानगीचे आदेश

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो : खासदार नारायण राणेंचा यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये नारायण राणे कुणाशीतरी फोनवरुन संवाद साधत असल्याचं दिसत होतं. गोव्यातील वाळू वाहतुकीबाबत फोनवरुन नारायण राणे कुणाशी तरी बोलताना पाहायला मिळाले होते. अखेर हा फोन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पाहा राणेंचा VIRAL व्हिडीओ –

काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्रातून होणाऱ्या वाळू वाहतुकीला कायदेशीर परवानगी देण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवनवार्ता लाईव्हशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी नारायण राणेंनी फोन केल्याचा वृत्ताबाबतही स्पष्ट भूमिका सावंत यांनी मांडली.

नारायण राणेंनी फोन केला होता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. वाळू वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती नारायण राणेंनी आपल्याकडे केली असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय.

हेही वाचा – Special report | Sand Issue | भरदिवसा तलवारी हातात घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कुणाचा वरदहस्त?

पाहा मुख्यमंत्र्यांचा EXCLUSIVE व्हिडीओ –

राज्यात वाळू वाहतुकीवरुन मोठा वाद पाहायला मिळाला होता. कुडाळसोबत सिंधुदुर्गातून येणारे वाळूचे डंपर आणि राज्यातील वाळू व्यावसायिकांमध्ये मोठा वाद आहे. या वादावरुन आता महाराष्ट्रातील वाळू वाहतुकीला राज्यात कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता राज्यातील वाळू वाहतूक करणारे व्यावसायिक नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सिंधुदुर्गातील वाळूच्या गाड्यांना मागील 25 दिवस गोव्यात नो एन्ट्री होती. खासदार नारायण राणे यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर आता सिंधुदुर्गातील वाळूचे डंपर पूर्वीप्रमाणे गोव्यात जायचा मार्ग मोकळा झाल्यानं आता गोव्यातील वाळू व्यावसायिकांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांकडून लक्षणीय प्रमाणात गोव्यात वाळू पुरावठा होतो. सिंधुदुर्गातील जवळपास दोनशेहून अधिक वाळूव्यावसायिक डंपरमालक चालक दररोज गोव्यात वाळू व्यवसाय करतात. खासकरुन कुडाळ, मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिक गोव्याला वाळूपुरवठा करतात. मात्र गेल्या 25 दिवसांपासून झालेल्या वादात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्या डंपर ना गोव्यात नो एन्ट्री होती. त्यामुळे वाळू व्यावसायिक डंपर-चालक हवालदिल झाले होते.

हेही वाचा – SAND | गोव्यातील रेती व्यावसायिकांनी महाराष्ट्राची रेती अडवली

आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्व वाळू व्यावसायिकांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त करत तोडगा काढण्याची विनंती केली होती. दरम्यान खासदार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. याचा व्हिडीओही समोर आला होता. राणे आणि सावंत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांच्या गाड्या गोव्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही याला दुजोरा दिलाय. त्यामुळे आता राज्यातील वाळू व्यावसायिक या सगळ्याकडे कशा पद्धतीनं पाहतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा – रेती व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी निश्चित

राष्ट्रीय हरीत लवादानं काढलेल्या आदेशानं गोव्यात वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी वाळूपट्टे आणि पर्यावरण खात्याची परवानगी घ्यावी लागण्याचे आदेश दिले होते. तसंत पारंपरिक पद्धतीनं वाळू उपसा करण्याचे आदेश दिले होते. मात्र यातील गुंतागुंतीच्या तांत्रिक अडचणींमुळे गोव्यातील वाळू उपसा बेकायदेशीर ठरतो. याविरोधात हायकोर्टात अनेक सामाजिक संस्थांनी आवाज उठवलाय.

हेही वाचा – गुंडगिरी संपवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

एकूणच गोव्यात वाळूउपसा होत नसल्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत होती. बांधकाम व्यवसायातील महत्त्वाचा घटक असणारी वाळू राज्याबाहेरुन आयात होत होती. त्यावर स्थानिकांनी आवाज उठवत परराज्यातून येणाऱ्या वाळू वाहतुकीवर आक्षेप घेतला होता. अखेर पुन्हा महाराष्ट्रातून येणाऱ्या वाळू वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यानं राज्यातील वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!