म्हादईवर भाजपच्या प्रभारींचं तूर्तास मौन, गोवन वार्ता लाईव्हच्या कॅमेऱ्यात EXCLUSIVE प्रतिक्रिया

सी. टी. रवी गोव्यात दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : भाजपचे प्रभारी गोव्यात आले आहेत. त्यांचा गोवा दौरा कसा असणार, याकडे सगळ्यांचंच बारीक लक्ष आहे. गोव्यात ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यताय. या पत्रकार परिषदेत नेमकं ते काय बोलतात या कडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र महत्त्वाचं म्हणजे सी. टी. रवी हे मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना म्हादईवरुन प्रश्न विचारला जाणारच.

गोवनवार्ता लाईव्हच्या कॅमेऱ्यात म्हादईवर प्रश्न विचारताना सी टी रवींनी बोलणं टाळलंय. त्यांनी मीटिंग झाल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, अशी सावध भूमिका यावेळी घेतली आहे. म्हापशामध्ये भाजपची कोअर कमिटीची बैठक होते आहे. या बैठकीत काय होतं, ते पाहणं महत्त्वाचंय. काँग्रेस पाठोपाठ भाजपचेही प्रभारी हे कर्नाटकचे असल्यानं चर्चांना ऊत आलेला आहे.

पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सी टी रवी यांनी म्हादईवर तातडीनं उत्तर देणं टाळलंय. आता ते यावर काय बोलतात, आणि काय भूमिका मांडतात, याकडे गोमंतकीयांचं लक्ष लागलेलं आहे. म्हादई प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मात्र कर्नाटक विरुद्ध गोवा सरकार असा संघर्ष तूर्तास पाहायला मिळतोय. गोव्यासोबतच कर्नाटकातही भाजपचच सरकार असूनही म्हादईबाबत पारदर्शी कारभार का होऊ शकत नाही, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!