‘उत्पादन शुल्क’ ची कणकवलीत मोठी कारवाई

10,82,000 किमतीच्या गोवा दारूसह 17 लाख 83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

उमेश बुचडे | प्रतिनिधी

कणकवली : राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत आयशर टेम्पोतून होणारी 10 लाख 82 हजार रुपये किमतीची गोवा दारू, टेम्पो, मोबाईल असा 17 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कणकवली शहरातील हॉटेल अनंत समोर एक्साईज अधीक्षक डॉ. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली निरीक्षक गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

संशयास्पद आयशर टेम्पो क्र. MH -04 -EY- 8964 हा हॉटेल अनंत समोर थांबवून टेम्पोच्या हौद्यात तपासणी केली. त्यावेळी लपवून ठेवलेली गोवा बनावटीची दारू सापडली. या प्रकरणी सौरभ सतीश ढोकळे ( रा. झरेगाव, चिलवाडी, ता.जि. उस्मानाबाद ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ लक्ष्मण राणे, जवान एस एस चौधरी, वाहनचालक मुपडे, वाहनचालक चव्हाण, महिला जवान स्नेहल कुवेसकर हे सहभागी होते. साजिद शहा, खान यांनी याकामी मदतनीस म्हणून काम केले. अधिक तपास निरीक्षक गणेश जाधव करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!