BREAKING : दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच!

गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांची स्पष्टोक्ती

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध आहे. मात्र दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच, अशी स्पष्ट भूमिका गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी घेतलीय.

विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पडणार, असं शेटये म्हणालेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचं थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. शिवाय परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. एका वर्गात केवळ 12 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होईल, असं शेटये म्हणालेत.

पॉझिटिव्ह आढल्यास विशेष काळजी

कोविडविषयक एसओपींचं पालन करण्यात येईल. तरीही एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या आयसोलेशनची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच्या उपचारांची काळजीही घेण्यात येईल, असं शेटये म्हणाले.

मडगावपाठोपाठ म्हापशातही विद्यार्थ्यांची निदर्शनं

दरम्यान, मडगावपाठोपाठ म्हापशातही विद्यार्थ्यांची निदर्शनं केली. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी आणि काही पालकांनी केली. परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करावा, असंही सुचवण्यात आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!