EXAMS | अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी

'अभाविप'ची मागणी; 30 टक्के गुण मागच्या सेमिस्टर परीक्षा निकालावर आधारित असावेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोरोना विषाणचा प्रादूर्भाव केंद्र सरकार, राज्य सरकार आणि असंख्य आरोग्य सेवकांच्या अथक परिश्रमांतून बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे, पण अजूनही परिस्थिती तशी नाजूकच आहे. अशा परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणं हानीकारक ठरू शकतं. ‘अभाविप’तर्फे राज्यातील अनेक शिक्षणतज्ञ व जाणकार व्यक्तींशी चर्चा करून गोवा विद्यापीठात निवेदन देण्यात आलं.

हेही वाचाः गोवा फॉरवर्डची घरातून सुरुवात!

अभाविपची मागणी

या निवेदनाद्वारे अंतिम वर्षाची परिक्षा ही ऑफलाईन पद्धतीने न घेता, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी यामध्ये 30 टक्के गुण हे मागच्या सेमिस्टर परीक्षा निकालावर आधारित असावेत, 20 टक्के गुण अंतर्गत परीक्षेच्या आधारावर व उर्वरीत 50 टक्के गुण ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना देण्यात यावे असा प्रस्ताव विद्यापीठापुढे मांडला आहे. त्याचप्रमाणे परीक्षा काळात जे विद्यार्थी कोरोनाबाधित असतील अशा विद्यार्थ्यासाठी पुनर्परीक्षेबद्दलही विचार करण्यात यावा आणि परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, पालक, विद्यार्थी संघटना आणि अन्य शिक्षणतज्ञांना सहभागी करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचाः इंधनाची दरवाढी करून भाजप सरकारने जनतेचे कंबरडे मोडलं

यावेळी गोवा विद्यापीठ संयोजक गौरव नाईक, दक्षिण गोवा जिल्हा संयोजक संकल्प फळदेसाई, सहसंयोजक खेमल प्रभु शिरोडकर, विद्यार्थिनी प्रमुख शबानी शिरोडकर, यश कंटक, वरद कामत येळेकर तसंच इतर विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!