प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजेः सिनारी

पेडणे पतंजली समितीतर्फे शिकेरी-मये येथील गोवा महासंघ गोशाळेत जडीबुटी दिवस साजरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः पेडणे पतंजली समिती तसंच इतर संघटनेच्यावतीने धन्वंतरी शिरोमणी आचार्य बालकृष्णाजी यांचा वाढदिवस तसंच जडीबुडी दिवस शिकेरी-मये येथील गोवा महासंघ गोशाळेत सर्वांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला. पेडणे पतंजलीच्यावतीने सुगंधित चाफ्याची झाडं लावण्यात आली.

हेही वाचाः दिलासादायक निर्णय! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसह रिटायर्ड झालेल्यांना मिळणार वेतनवाढ

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी वृक्षरोपण करताना अखिल गोवा महासंघाचे गोशाळेचे अध्यक्ष कामालकांत तारी, गोवा वनखात्याचे केरी शाखेचे प्रदीप व्ही सीनरी, सी ये कळंगुटकर, पतंजली राज्य प्रभारी विश्वास कोरगावकर, पेडणे भारत स्वाभिमान अध्यक्ष किशोर किनळेकर, किसन अध्यक्ष विनायक कंदोळकर, पतंजली अध्यक्ष प्रदीप नाईक, योग शिक्षिका सूचित परब, कविता परब, प्रतीक्षा परब, कुमारी सुरेखा किनळेकर आणि केशव परब, अभिमन्यू परब आणि रुद्रेश तेली उपस्थित होते. यावेळी वनखात्याचे प्रदीप सिनारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

प्रत्येकाने एक तरी झाड लावा

प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. जेणेकरून आमच्या येणाऱ्या पिढीला त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आपल्याला ऑक्सिजन मिळण्यास फायदा होऊ शकतो. तसंच त्यांनी वेगवेगळ्या झाडांची माहिती दिली आणि झाडं कशाप्रकारे व्यवस्थित लावली पाहिजेत, असं सिनारी यावेळी म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!