निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकालाः मायकल लोबो

टीटोजचे मालक रिकार्डो डिसोझा यांची राजकीय घोषणेबाबत दिली प्रतिक्रिया

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे कुणीही निवडणूक लढवू शकतो, असं कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले. रिकार्डो डिझोसा यांच्या निवडणूक लढवण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना मायकल लोबो बोलत होते.

आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे प्रत्येकाला त्याचे त्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येकजण निवडणूक लढवूच शकतो. फक्त कुणाला निवडणून आणायचं हे जनता ठरवते. जर कळंगुटवासियांना मायकल लोबो यायला हवा, तर कितीही प्रतिस्पर्धी उभे राहिले तरी मायकल लोबोच निवडणून येणार, असा विश्वास लोबोंनी व्यक्त केलाय.

रिकार्डो डिसोझा हे नावं गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलंय. टिटोजचे मालक म्हणून प्रसिद्ध असलेले रिकार्डो डिसोझा यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या हायकमांडची भेट घेतल्याचं वृत्त मागच्या दिवसात चर्चेत असताना ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चाललीये. याविषयी आपलं मत मांडताना मायकल लोबोंनी वरील प्रतिक्रिया दिलीये.. अजून काय म्हणालेत लोबो, जाणून घेण्यासाठी पहा खालील व्हिडिओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!