प्रत्येक महिला, कुटुंब आत्मनिर्भर व्हावे !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ;राज्य आत्मनिर्भर बनवायचे आहे

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : ‘स्वयंपूर्ण गोवा-आत्मनिर्भर भारत २.०’ हा केंद्र सरकारचा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात सर्व नागरिकांना पायाभूत सुविधा आणि योजना देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सरकार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. महिलांनी  यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
हेही वाचा:उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा… ‍

गायीच्या शेणापासून ग्रीन दिया बनविण्याचे प्रशिक्षण      

थॉमस सेवा फाउंडेशन आणि ग्रीन व्हेव एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स यांच्यातर्फे ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा २.०’ अंतर्गत सुर्ला येथे सिड बॉल आणि गायीच्या शेणापासून ग्रीन दिया बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. व्यासपीठावर संचालक शैलेश  इंगळे, विजय  सक्सेना, सावियो  राड्रिग्ज, उपजिल्हाधिकारी  दीपक वायंगणकर, गटविकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर, लक्ष्मीकांत  सुर्लीकर, मुख्याध्यापक सर्वेश्वर नाईक आदी उपस्थित  होते.
हेही वाचा:सत्तरी तालुका जुगाराच्या विळख्यात… ‍

कुटुंबाने लाभ घेतला तर स्वयंपूर्णतेचे स्वप्न सहज पूर्ण      

राज्य आत्मनिर्भर बनवायचे आहे. नागरिकांनी या मोहिमेला साथ द्यायला हवी. राज्यातील अनेक सरकारी मंडळे अल्प दरात आर्थिक भांडवल उपलब्ध करत असून सर्वाधिक अत्यल्प व्याजदर  व भरमसाट सवलत अशा या योजना आहेत. त्याचा प्रत्येक कुटुंबाने लाभ घेतला तर स्वयंपूर्णतेचे  स्वप्न सहज पूर्ण करता येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
हेही वाचा:सभापतींनी त्वरित पोलिस तक्रार करुन मुख्यमंत्र्याची चौकशी करावी… ‍

कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली

सावियो रॉड्रिग्ज यांनी थॉमस सेवा फाउंडेशन आणि ग्रीन व्हेव एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, महिलांना स्वबळावर उभे करून त्यांना रोजगारप्राप्ती करून देण्याचे, त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम आमची संस्था करते. कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सूत्रसंचालन ज्योती  सिनारी यांनी  केले.
हेही वाचा:पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना प्रशिक्षण… ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!