राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत एथन वाझला सुवर्णपदक…

१४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान श्रीलंकेत या स्पर्धेचे करण्यात आले आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांखालील खुल्या गटात गोव्याच्या एथन वाझने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   
हेही वाचाः”शाळांना सध्या आहेत तीच नावे कायम ठेवा”…  

युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला गोमंतकीय खेळाडू

श्रीलंका येथे खेळवण्यात आलेल्या १२ वर्षांखालील राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत एथनने शानदार कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकत देशाचे व गोव्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले. एथन खुल्या गटात आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला गोमंतकीय खेळाडू आहे.    एथनच्या या विजयानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार जोशुआ डिसोझा, आमदार विजय सरदेसाई यांच्यासह अनेकांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. एथन हा मडगावमधील सां जुझे द आरियल शाळेचा विद्यार्थी आहे. 
हेही वाचाःShraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात मोठा ट्विस्ट; आफताबच्या वकिलांनी…

क्रीडा क्षेत्रातील कारकिर्द

या वर्षाच्या सुरुवातीला ‘राष्ट्रीय १२ वर्षाखालील खुल्या बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यामुळे एथनची फिडे वर्ल्ड कॅडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. जागतिक कॅडेट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप १६ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत नियोजित होती. याशिवाय एथनने मांड्या-कर्नाटक येथे झालेल्या १२ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. यामुळे त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. एथन वाझने या विजयानंतर आनंद व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले असून यापुढेही अशीच कामगिरी करत राहण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला.
हेही वाचाःऑफलाईन २९ दुकानांतून शंभर टक्के मालाची उचल…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!