दाबोळीत नौदलाकडून लसीकरण केंद्राची स्थापना

नौदलाने सुरू केलं लसीकरण केंद्र; नौदलाच्या राजहंस थिएटरमध्ये शुभारंभ

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

दाबोळीः राज्यात वाढत्या कोविड-19 च्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी भारतीय नौदलाने दाबोळीतील विमानतळ रोडवरील नौदल सभागृह (राजहंस थिएटर) येथे एक लसीकरण केंद्र सुरू केलं आहे. रविवारी वगळता सर्व दिवस हे लसीकरण केंद्र सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंत कार्यरत असणार आहे. लाभार्थी स्लॉट नोंदणीसाठी को-विन पोर्टलवर किंवा वॉक-इनद्वारे नोंदणी करू शकतात. सध्या वयोगटातील ४५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी लसीकरण सुरू आहे.

नौदलाच्या राजहंस थिएटरमध्ये लसीकरण केंद्राचा शुभारंभ

नौदलाने दक्षिण गोव्यातील सर्व लोकांची काळजी घेण्यासाठी आणि रवींद्र भवन लसीकरण केंद्रावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी या लसीकरण केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रात सध्या ४५ वर्षांहून अधिक वयोगटाचं लसीकरण होत आहे. एका आठवड्यात जर सरकारकडून निर्देश जारी केले गेले, तर १८ ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण इथे सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र अत्याधुनिक लसीकरण केंद्र असून नोंदणीसाठी इथे तीन स्वतंत्र विभाग आहेत. रांगेत मॅनेजमेंट सिस्टम, लसीकरण बूथ (दोन बूथ) क्षेत्र आणि लसीकरणानंतर ऑब्जरवेशन रूम अशा रचना इथे आहे. असं सर्जन कमांडंर हरी यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!