ईएसआयचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

घर, कार्यालयावर छापे : गुन्हा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने पणजीतील राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे (ईएसआय) सामाजिक सुरक्षा अधिकारी हनिफ शेख यांच्याविरोधात ५७ लाख ९५ हजार ४ रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सीबीआयने मंगळवारी शेख यांच्या घरावर तसंच कार्यालयावर छापा मारून महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहेत.

ईएसआय हनिफ शेख सीबीआयच्या जाळ्यात

या प्रकरणी सीबीआयने सामाजिक सुरक्षा अधिकारी हनिफ शेख यांच्या १ जानेवारी २००५ ते १५ फेब्रुवारी २०२१ या सेवा कालावधीच्या आणि कुटुंबियांच्या मालमत्तेचे लेखा अहवाल तपासले. जानेवारी २०२१ पर्यंतचं त्यांचं वेतन ५७ लाख १ हजार ६२० रुपये झालं आहे. याशिवाय एचडीएफसी, जीवन विमा व इतर प्रकारच्या विम्याची रक्कम आणि व्याज मिळून ४ लाख ५३ हजार ९९३ रुपये मिळाले. हे सर्व मिळून त्यांचं एकूण उत्पन्न ६१ लाख ५५ हजार ६१३ रुपये ग्राह्य धरण्यात आलं. वरील कालावधीत शेख यांनी २००६ मध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे घोगळ येथे ४ लाख ९२ हजार ७०० रुपये किमतीची ३४५ चौ.मी. जमीन घेतली. शेख यांनी २००९ मध्ये आके आल्त येथे ४० लाख रुपये किमतीचा बंगला बांधल्याची चौकशी दरम्यान माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे २३ लाख ४७ हजार ३४७ रुपयांची गुंतवणूक व इतर जंगम मालमत्ता मिळून एकूण मालमत्ता ६८ लाख ४० हजार ०४७ रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. वरील कालावधीत त्यांनी ५१ लाख १० हजार ५७० रुपये खर्च केले आहेत. १० लाख ४५ हजार ०४३ रुपये सीबीआयने संभाव्य बचत म्हणून ग्राह्य धरली आहे. त्यामुळे वरील कालावधीत हनीफ शेख यांच्याकडे उत्पन्नातील ९४ टक्के म्हणजे ५७ लाख ९५ हजार ४ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा सीबीआयने केले आहे.

हेही पहाः MHADEI I म्हादईबाबत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांना निर्देश

मंगळवारी बंगल्यावर मारला छापा

त्यामुळे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सीबीआय गोवा विभागाचे अतिरिक्त अधीक्षक सी. बी. रामादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला निरीक्षक अपर्णा चोपडेकर यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शेख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३(२) व आर/डब्ल्यू १३(१)(बी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने शेख यांच्या पणजीतील कार्यालयासह आके – मडगाव येथील बंगल्यावर मंगळवारी छापा मारला व महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहेत.

हेही पहाः Special Report | Car Tinted Glass | काळ्या काचेच्या गाड्यांमधून फिरणाऱ्या आमदारांचं काय करणार?

हेही पहाः Special Report | छत्रपतींचा अवमान करणाऱ्याला अखेर अटक

हेही पहाः Crime | Special Report | पर्वरीतील बंगल्यातून 12 संशयितांना अटक

हेही पहाः RG | Politics | का नाकारली जाते आरजीच्या सभेला परवानगी?

twitter sharing button
whatsapp sharing button
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!