इयत्ता 11 वी डिप्लोमा, विज्ञान शाखेत प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा 31 जुलै रोजी

सकाळी 10.30 ते दुपारी 1 पर्यंत ही परीक्षा घेणार; गोवा शालांत मंडळाकडून परिपत्रक जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड महामारी आणि लॉकडाऊन अशा संकटांना मोठया ध्येर्यांनं तोंड देत गोवा शालांत मंडळानं अखेर दहावीचा निकाल 12 जुलै रोजी जाहीर केला. यावर्षी दहावीचा निकाल तब्बल 99.72 टक्के इतका लागला. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीसाठी डिप्लोमा आणि विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी एक दिवासची 3 तासांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे या प्रवेश परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.  

हेही वाचाः या अधिकाऱ्यांना जाब विचाराच!

31 जुलै रोजी परीक्षा

2021-22 शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 31 जुलै रोजी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. याविषयीची माहिती देणारं परिपत्रक गोवा शालांत मंडळाकडून जारी करण्यात आलंय. 31 जुलै रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 पर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन मोडच्या माध्यमातून घेणार असल्याचं परीपत्रकात म्हटलंय. गोवा शालांत मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीची परीक्षा त्यांच्या शाळेतच होणार असून इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं ठिकाण त्यांच्या एडमिट कार्डवर नमूद करणार असल्याचं परीपत्रकात म्हटलंय.

हेही वाचाः रोहन हरमलकरला अटकपूर्व जामीन

शाळा प्रमुखांनी आयोजकांशी संपर्क करावा

प्रवेश परीक्षेसाठी बसण्याची रचना जाणून घेण्यासाठी शाळा प्रमुखांनी परीक्षा केंद्रांच्या मार्गदर्शकाशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलंय. कोविड नियमावलीचं पालन करून शाळांमध्ये मुलांची बसण्याची रचना करावी, असं आवाहन गोवा बोर्डाकडून करण्यात आलंय.

हेही वाचाः राज्यातील रस्त्यांची स्थिती चिंताजनक; प्रवाशांची केवळ गैरसोयच

तालुक्यातील शाळा; परीक्षा केंद्राच्या मार्गदर्शकाचे नाव आणि संपर्क खालील यादीत दिल्याप्रमाणे

हा व्हिडिओ पहाः FLOOD # INSPECTION- मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त पाहणी दौरा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!