पाळोळेत सागरी कासवाला जीवदान

मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलं कासव; कासव एक मीटर लांब असल्याची माहिती

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोण: मासेमारी जाळीमध्ये सापडलेल्या सागरी कासवाला जीवनदान देण्यात आलं. पाळोळे येथील मच्छीमार समुद्रात जाळी टाकुन मासळी पकडण्यास गेले असता त्यांच्या जाळ्यात मासळी बरोबरच सागरी कासव सापडला होता.

कासव सापडल्याची जाळ्यात माहिती काणकोणच्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर कासवाला वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र कासव जखमी असल्यानं त्याच्यावर काणकोणच्या जनावरांच्या दवाखान्याच्या डॉ. अनिषा पिनेरो यांनी उपचार केले आणि शेवटी त्या कासवाला पुन्हा पाण्यात सोडण्यात आलं. हा कासव एक मीटर लांब असल्याचे वनखात्याचे रक्षक मंजुनाथ कालगुंटकर यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः POLICE| पोलिस खात्याच्या भरतीला प्रचंड प्रतिसाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!