मंदिरे, देवस्थान परिसर, पर्यटन स्थळांच्या विकासावर भर

आमदार दयानंद सोपटेंची माहिती; आतापर्यंत राज्यात २२८ कोटींची विकासकामं पूर्ण

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत जास्तीत जास्त निधीचा वापरत करून विकास केला जाईल, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळ अध्यक्ष तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटेंनी दिली. पार्सेतील श्री राष्ट्रोळी देवस्थान परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ गोवा पर्यटन विकास महामंडळालातर्फे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच अजित मोरजकार, बापू पोळजी, शेखर पोळजी आदी उपस्थित होते. आमदार दयानंद सोपटेंनी पर्यटन विकास महामंडळाचा ताबा घेतल्यानंतर आजपर्यंत केलेल्या कामांचा यावेळी धावता आढावा घेतला.

आतापर्यंत राज्यात २२८ कोटींची विकासकामं पूर्ण

आतापर्यंत किमान २२८ कोटींची कामं राज्यात केली आहेत. पर्यटनाला वाव देण्यासाठी आणि पर्यटकांना राज्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल, असं सोपटे यावेळी म्हणाले. पेडणे तालुक्याचा विचार केल्यास आमदार सोपटे पर्यटन विकास महामंडळाचे चेरमेन झाल्यानंतर पार्सेतील श्री भगवती मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. राज्यातील एक आकर्षक असं हे मंदिर पर्यटकांना खेचून आणेल असं नियोजनबद्ध काम आमदार सोपटे स्वतःच्या देखरेखीत रात्रंदिवस करून घेतायत. या मंदिराच्या सुशोभिकरणावर चार कोटी ५९ लक्ष रुपये खर्च करण्यात येत आहेत.

पेडण्यातील विकास कामं आणि खर्च

मांद्रेतील स्वामी सिद्धारूढ मठ आणि पालयेतील श्री भूमिका देवी मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर १ कोटी ९ लाख रुपये; केरीतील श्री रवळनाथ मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर ३ कोटी ८० लाख रुपये; पेडणेतील श्री भगवती मंदिर परिसराचं सुशोभिकरण २ कोटी ३० लाख रुपये; कोरगाव पंचायत क्षेत्रातील दाडेश्वर मंदिर, तळी, सुनी मशीद यावर एकूण ३ कोटी २४ लाख रुपये; हणखणेतील भराडी मंदिर, इब्रामपूरातील सातेरी मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर ३ कोटी २६ लाख रुपये; सावंतवाडा मांद्रेतील भूमिका मंदिर परिसराच्या रोषणाई आणि सुशोभिकरणावर १ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मतदारसंघातील प्रमुख समस्या सोडविण्यावर देणार भर

मांद्रे मतदारसंघातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज्याबरोबरच मतदारसंघात पर्यटन विकास महामंडळामार्फत विकासात्मक प्रकल्प राबवताना बेरोजगारीचा प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. समुद्र किनाऱ्यापलीकडील पर्यटनाला वाव देण्यासाठी स्वदेश दर्शन योजनेंतर्गत एकूण चाळीशी मतदारसंघात प्रकल्प राबवण्याचा मनोदय आहे. मांद्रे किनारी भागात पोलीस चौकी, वीज उपकेंद्र, रवींद्र कला भवन, किनारी सौचालायाची सोय, भूमिगत वीज वाहिन्या, तेरेखोल केरी अर्धवट असलेल्या पुलाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं यावेळी सोपटेंनी सांगितलं.

मतदारसंघाबरोबरच राज्यात राबवलेले प्रकल्प

गोवा पर्यटन विकास महामंडळमार्फत मांद्रे मतदारसंघात तसंच राज्यात प्रकल्प उभारले गेलेत. शांता मोनिका जेटी परिसराच्या सुशोभिकरणावर ५ कोटी 3 लाख रुपये, हणजुण सुशोभिकरण तसंच बोडगेश्वर मंदिर ते संकलेश्वर वेर्ला काणका रस्त्यावर 7 कोटी 63 लाख रुपये, दक्षिण गोव्यातील किनारी भागात शौचालय सुशोभिकरणावर 4 कोटी 82 लाख तसंच उत्तर गोव्यात 4 कोटी 82 लाख रुपये, हायमाक्स भूमिगत केबल तसंच तीरामल सर्कल विदूत रोषणाईसाठी 3 कोटी 37 लाख, काणकोणातील मल्लिकार्जुन मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर 3 कोटी 25 लाख, साळगाव चर्च परिसर विकास तसंच सुशोभिकरणावर 2 कोटी 60 लाख रुपये, नेरूल येथील अवर लेडी रेमेडियस चर्च परीसराच्या सुशोभिकरणावर 1 कोटी 61 लाख रुपये, काकोडा येथील महादेव मंदिर सुशोभिकरणावर ५६ लाख, सावईवेरे आरसीपीआर एज्युकेशन टॉयलेट ब्लॉकसाठी 24 लाख रुपये, पर्यटन भवन सुविधेसाठी 2 कोटी 22 लाख, कुडचडे बसस्थानकजवळ 6 कोटी 64 लाख, मंगेशी म्युझियमवर 2 कोटी 17 लाख,  कळंगुट बागा रस्ता सुशोभिकरणावर 59 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सोपटेंनी दिली. काही प्रकल्पांचं टेंडर झालं आहे. पण कामाची ऑर्डर मिळालेली नाही. जवळ जवळ 228 कोटी रुपये खर्च करून कामं चालू असल्याचं सोपटेंनी सांगितलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!