Video | Ward No.142मधील ऑक्सिजनच्या समस्येनंतर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

Goan Varta Live | प्रतिनिधी

जीएमसीत मंगळवारी रात्री ऑक्सिजनच्या समस्येवरुन एकानं फेसबूक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना ही समस्या तात्काळ सोडवण्यात आल्याचा दावा केलाय. त्याचसोबत राज्यात कोणत्याही स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा भासू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे त्यांनी लोकांनाही घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. निष्कारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. या सगळ्यासोबत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विरोधकांची झालेली संयुक्त बैठक, लसीकरण, नव्या उपाययोजना, आणि पत्रकारांचं लसीकरण यावरही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेत, ते जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!