पेट्रोल डिझेलनंतर विजेचा नंबर! वाचा नेमकी किती दरवाढ

महामारीनंतर महागाईनं सामान्यांचे हाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर राज्य सरकारने विजेच्या दरातही वाढ केली आहे. घरगुती वापरासाठीच्या ग्राहकांना पहिल्या 100 युनिटपर्यंत 9.09 पैसे तसेच 101 ते 200 युनिटपर्यंत 13.35 पैसे प्रतियुनिट अशी दरवाढ केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 अशा तीन महिन्यांसाठी असलेली ही दरवाढ जानेवारी ते मार्च 2021 पर्यंतच्या बिलांमध्ये समाविष्ट होईल.
इंधन आणि वीज खरेदी किंमत समायोजन (एफपीपीसीए) फॉर्म्युलानुसार संयुक्त वीज नियमन आयोगाने या दरवाढीला मान्यता दिली आहे.

खिशाला कात्री

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचेही दर वाढवले आहेत. त्यानंतर आता विजेच्या दरातही वाढ झाली आहे. गोव्यात सध्याचा पेट्रोलचा दर 85 रुपये तर डिझेलचा दर 81 रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला आणखी थोडी कात्री लागली आहे.

घरगुती वापरासाठी काय दर?

एफपीपीसीएच्या मान्यतेमुळे घरगुती वीज ग्राहकांसाठी 100 युनिटपर्यंट 9.09 पैसे, 101 ते 200 युनिटपर्यंत 13.35 पैसे, 201 ते 300 युनिटपर्यंत 10.01 पैसे, 301 ते 400 युनिटपर्यंत 21.94 पैसे आणि 400 पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांना 24.27 पैसे प्रतियुनिट अशी दरवाढ लागू होईल.

व्यावसायिक वापरासाठी?

एलटीसी व्यावसायिक वीज वापरासाठी 100 युनिटपर्यंत 21.46 पैसे, 101 ते 200 युनिटपर्यंत 25.04 पैसे, 201 ते 400 युनिटपर्यंत 28.92 पैसे तसेच 400 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्यांना 31.36 पैसे प्रतियुनिट दरवाढ असेल.

उद्योगांसाठी?

एलटी जोडण्या असलेल्या उद्योगांसाठी 500 युनिटपर्यंत 27.37 पैसे आणि 500 पेक्षा जास्त युनिट वीज वापरासाठी 24.59 पैसे अशी दरवाढ लागू झाली आहे. एलटीपी जोडण्या असेल्या हॉटेल उद्योगांसाठी 28.83 पैसे प्रतियुनिट, होर्डिंगसाठी 67.27 पैसे प्रतियुनिट अशी दरवाढ करण्यात आली आहे. कृषिक्षेत्राला वीज दरवाढीतून वगळले आहे. हंगामी व्यावसायिक एलटी वीज जोडण्यांसाठीही मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे.

तुलनेने कमीच दरवाढ!

यापूर्वी जुलै ते सप्टेंबर 2020 या तीन महिन्यांसाठी जी वीज दरवाढ ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या बिलांमध्ये समाविष्ट केली होती ती दरवाढ आतापेक्षा जास्त होती. त्या दरवाढीच्या तुलनेत सुमारे 45 टक्के दरवाढ यावेळी कमी आहे.

हेही वाचा – वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!