भाजपच्या घराणेशाहीचा म्हापशेकारांना बसला फटका

आम आदमी पार्टीचे नेते राहुल म्हांबरेंची सरकारवर घणाघाती टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः चार दिवसांपासून म्हापसा शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याबद्दल सरकारचा, खासकरुन म्हापसा आमदाराचा आम आदमी पक्षाने निषेध केला आहे. म्हापसा येथील रहिवासी आणि राज्य संयोजक राहुल म्हांबरेंनी हा मुद्दा धरून सरकारवर घणाघाती टीका केली आहे. भाजपने म्हापशेकारांची मते मिळविण्यासाठी त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु त्यांनी लोकांना मूर्खात काढत केवळ त्यांना परिवारराज देण्यात आलं, आमदार म्हणून घराणेशाहीतील हा लोकप्रतिनिधी पूर्णतः अपयशी ठरला.

हेही वाचाः CORONA UPDATE | गुरुवारी कोरोनाने घेतले तब्बल 44 बळी

म्हापसाला भाजपने अश्मयुगात परत नेलं

100 तासांपेक्षा जास्त वेळ आम्ही म्हापशेकार अंधारात आहोत. निवडणुकीच्या वेळी भाजपने आश्वासित केलेला विकास हाच आहे का?  असं वाटतं की म्हापसाला भाजपने अश्मयुगात परत नेलं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया म्हांबरेंनी व्यक्त केली.

हेही वाचाः ‘एचसीसीबी’कडून दक्षिण गोव्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

सर्वसामान्यांच्या दु:खाची काळजी नाही

माजी आमदार दिवंगत फ्रान्सिस डिसूझा यांचा मुलगा जोशुआ डिसूझा पुन्हा एकदा या संकटकाळी पूर्णपणे अनुपस्थित आणि गायब असल्याबद्दल म्हांबरेंनी नाराजी व्यक्त केली. स्वत:च्या बंगल्यात वीज जनरेटर चालविला जात असल्याने जोशुआ यांना सर्वसामान्यांच्या दु:खाची काळजी नाही, असा टोला म्हांबरेंनी डिसूझांना लगावलाय.

हेही वाचाः खतांवरील अनुदान वाढवण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

जनतेची कवडीची किंमत नाही

स्थानिक व्यवसायिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. लोक पाणी नसल्याने त्रस्त आहेत, त्यांना त्यांच्या घरात बादलीने पाणी आणावं लागतंय. मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर यामुळे परिणाम झालाय. म्हापसात संपूर्ण गदारोळ माजलाय. परंतु वडिलांच्या वारशाने आमदारकी मिळवलेला ‘राजकुमार’ जोशुआ मात्र डोंगराच्या माथ्यावर असलेल्या आपल्या किल्ल्यात आनंदाने राहातोय. त्याला जनतेची कवडीची किंमत नाही, अशी खणखणीत टीका म्हांबरेंनी केलीये.

हेही वाचाः 18-44 वयोगटातून लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

131 कोटी रुपयांचं नक्की काय झालं?

जून 2019मध्ये डिसूझांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देताना म्हांबरे म्हणाले, म्हापसातील ऊर्जा संकट लवकरच भूतकाळातील जमा होईल.डिसूझांनी दोन वर्षांपूर्वी म्हापसामध्ये वीजवाहिन्यांच्या भूमिगत केबलिंगसाठी जाहीर केलेली 131 कोटी रुपयांचं नक्की काय झालं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे, असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः कोविड लढ्यात शहरी, ग्रामीण भागासाठी वेगवेगळे धोरण ठेवा !

विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक

उपलब्ध साधनांसह वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न करत असलेल्या संपूर्ण गोव्यातील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आम आदमी पार्टीच्या वतीने म्हांबरेंनी कौतुक केलं. कर्मचार्‍यांना आवश्यक असणारी सामान्य आणि अद्ययावत उपकरणं उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी ऊर्जा मंत्रालय आणि राज्य सरकारला जबाबदार धरलं.  ‘आप’च्या म्हापसा युनिटने बुधवारी लाइनमनला (वीजविभागाच्या कर्मचाऱ्यांना) जेवणाची पाकिटे उपलब्ध करुन दिली. कारण ते सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय, विश्रांती न घेता बरेच तास सलग काम करत होते.

हेही वाचाः जादा भाडे आकारल्यास रुग्णवाहिकेवर कारवाई

लोकांचा विश्वास पूर्णपणे गमावला

अनेक वर्षांपासून भाजपच्या चुकीच्या कारभारामुळे म्हापशातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याची टीका म्हांबरेंनी केली. एरवी म्हपसाचे भाजपा मंडळ प्रत्येक विषयावर आपल्या सरकारचा बचाव करण्यास सदैव तत्पर असतं. मात्र आता ते मूग गिळून गप्प आहेत. कारण त्यांना माहीत आहे की, लोकांचा विश्वास त्यांनी पूर्णपणे गमावला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आता हे जाणलं पाहिजे की त्यांची राजकीय निष्ठा ही कोरोनाकाळात किंवा चक्रीवादळाच्या वेळी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबालादेखील वाचवू शकले नाही किंवा त्यांना दिलासा देऊ शकले नाहीत, असा टोला म्हांबरेंनी हाणला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!