कोंबड्या, अंड्यांच्या आयातीवर बंदी

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कर्नाटक, महाराष्ट्रात बर्ड फ्लू पसरला असल्याने दक्षिण गोव्यात कोंबडी व अंड्यांच्या आयातीवर बंद आणली आहे.

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी दोन्ही राज्यांतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कोंबड्या व अंडी आयात करण्यावर बंदी घातली आहे. पशुसंवर्धन खात्याने ही बंदी लागू करण्यास सांगितले होते.

कोणी कोंबड्या वा अंडी आणली, तर त्याच्यावर कलम 188 खाली कडक कारवाई करण्यात येईल, असे न्या. नाईक यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.