‘भारतीय पॅनोरमा’साठी प्रवेशिका भरण्याचं ‘ईफ्फी’चं आवाहन

शेवटची तारीख आहे 12 ऑगस्ट 2021

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ईफ्फीच्या भारतीय पॅनोरमा या विभागात, चित्रपट कलेच्या प्रसारासाठी सर्वोत्कृष्ट समकालीन भारतीय चित्रपटांची निवड केली जाते. 52 व्या ईफ्फी भारतीय पॅनोरमा 2021 विभागात  प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. त्यामुळे या विभागात प्रवेशिका भरण्याचे आवाहन ईफ्फीने पुन्हा एकदा केले आहे.

20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात होणार्‍या ईफ्फीसाठी 18 जुलै 2021 पासून प्रवेशिका स्वीकारण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे आणि इतर आवश्यक कागद्पत्रांसह ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी म्हणजेच संगणकीय माहितीची कागदपत्र प्राप्त करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.

2021 च्या भारतीय पॅनोरमा विभागासाठी चित्रपटाची प्रवेशिका दाखल करताना मार्गदर्शक तत्त्व पाळणे आवश्यक आहे. प्रवेशिका दाखल केलेल्या चित्रपटाची, निर्मिती पूर्ण झाल्याची तारीख किंवा सीबीएफसी म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरणाची तारीख महोत्सवापासून मागील 12 महिन्यांत म्हणजे 1 ऑगस्ट ते 31 जुलै 2021 पर्यंतची असावी. केंद्रीय चित्रपट प्रमाणिकरण मंडळाद्वारे प्रमाणित नसलेल्या आणि या कालावधीत निर्मिती झालेल्या चित्रपटांच्या प्रवेशिका देखील दाखल करता येतील. सर्व चित्रपटांमध्ये इंग्रजी उपशीर्षके असणे आवश्यक आहे, असंही कळवण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!