शैक्षणिक व्यवस्थेला पुनर्विचाराची गरज: पिल्लई

वसंतराव धेंपे हिरक महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान मालिकेच्या उद्घाटनप्रसंगी केलं प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारतीय शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी व्यापक विचारविनिमय आवश्यक आहे, असं गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितलं. वसंतराव धेंपे हिरक महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान मालिकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्त मिरामार येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

हेही वाचाः २०१९ बॅचचे अधिकारी शिवेंदू भूषण यांची गोव्यात नियुक्ती

संस्थेची ६० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन

संस्थेची ६० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त धेंपे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मिरामार यांनी भारतीय शैक्षणिक प्रणालीचा पुनर्विचार या विषयावरील या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राज्यपाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या एकात्मिक विकासासाठी शिक्षण ही मूलभूत आवश्यकता आहे. एखाद्याला सन्माननीय जीवन जगण्यासाठी जन्मजात कौशल्ये विकसित करणं देखील आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे. भारतात शिक्षण क्षेत्रात मोठी परंपरा आहे, जी प्राचीन काळात नालंदा, विक्रमशीला, तक्षशीला सारख्या महान विद्यापीठांच्या अस्तित्वाने स्पष्ट होते. चांगले शिक्षणतज्ज्ञ, वकील, डॉक्टर, शिक्षक, अभियंते, राजकारणी निर्माण करण्यासाठी शिक्षणाला व्यापक दृष्टीकोन असणं आवश्यक आहे, असं राज्यपाल म्हणाले.

हेही वाचाः अध्यक्षांशिवाय काँग्रेस पक्ष पुढे कसा जाणार ?

सध्याच्या सरकार रोजगारभिमुख शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारं

संस्थेची स्थापना करणाऱ्या या ट्रस्टच्या दूरदर्शींनी एक मोठं उद्दीष्ट ठेवलं आहे ज्याचं पालन होणं आवश्यक आहे, ज्यासह आपण रोजगार सुरक्षित करण्यास पात्र असलेल्या आपल्या देशाचे चांगले नागरिक तयार करू शकू. पूर्वी रोजगाराभिमुख शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं गेलं नव्हतं, जे आता सध्याच्या सरकारने केलं आहे. सर्व गोंयकारांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं हे उदात्त उद्दीष्ट समोर ठेवून दूरदर्शींनी ही संस्था स्थापन केली, असं डीसीटीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे म्हणाले.

या कार्यक्रमाला गोवा विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर वरुण साहनी, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, ट्रस्टी पल्लवी धेंपे, गोवा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार राधिका नायक, डीसीटीचे सदस्य आणि इतर उपस्थित होते.

हा व्हिडिओ पहाः Video | IPS | LADY SINGHAM | आयपीएस अस्लम खान गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!