शैक्षणिक संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणं गरजेचं

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटेंचं प्रतिपादन; श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वेब साईटचं अनावरण

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः काळाच्या प्रवाहासोबत पुढे जाण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटेंनी केलं. कोरगाव येथील श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वेब साईटचं अनावरण करताना ते बोलत होते.

हेही वाचाः पक्षांतराला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी क्रांतीकारी पावले उचलण्याची वेळ

विविध मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष परशुराम गावडे उपस्थित होते. तसंच व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अशोक रेडकर, सचिव मोहन आरोलकर, कार्यकारिणी सदस्य रोहिदास भाटलेकर, प्राचार्य सुदन बर्वे, पालकशिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद तळकर, उपाध्यक्ष तथा हरमलचे सरपंच मनोहर केरकर, उपाध्यक्ष धनंजय दाभाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचाः साळावली धरण ओव्हरफ्लो;पावसाची बॅटिंग सुरूच

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही कोविडची देणगी

यावेळी बोलताना आमदार सोपटे म्हणाले, कोरोनाच्या काळात विध्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर वर्गात बसून शिक्षण घेणं शक्य नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू करावी लागली आहे. त्यात कोरोनामुळे विद्यालयात येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणं शक्य नसल्यानं विद्यालयातील प्रवेशसुद्धा ऑनलाईन झाला. त्यासाठी वेबसाईट अत्यंत गरजेची झाली आहे. श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाने वेबसाईट सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केली आहे. विद्यालयात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यात आता वेबसाईटची भर पडल्यानं विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती घरबसल्या मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रावीण्य मिळवावं. कोविड महामारीच्या काळात आम्ही बरंच काही शिकलो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही एक कोविडची देणगी आहे. सरकारने शिक्षणासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्याचा योग्य उपयोग करून गोवा हे एक शैक्षणिकदृष्ट्या नंबर वन राज्य करूया. पालक शिक्षक संघाने पुढाकार घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार सोपटेंनी अभिनंदन केलं. विद्यालयाला भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

हेही वाचाः भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन

यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद तळकर यांनी शिक्षक तसंच विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. या वेबसाईटचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष परशुराम गावडे विद्यालयाच्या उत्कर्षासाठी व्यवस्थापन मंडळ नेहमीच कार्यरत असेल असं म्हणाले. पालक शिक्षक संघाच्या सहकार्यातून आज वेबसाईट सुरू होते ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचाः विलास मेथर हत्याप्रकरण! मुख्य संशयिताला दिलासा नाही, जामीन अर्ज फेटाळला

सोपटेंच्या हस्ते वेबसाईटचं अनावरण

आमदार दयानंद सोपटेंनी यावेळी वेबसाईटचं अनावरण केलं. नितीन आयिर यांनी वेबसाईटविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य सुदन बर्वे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. तर स्वाती वेंगुर्लेकर, जुही थळी, भारती पंचवाडकर, दिपश्री सोपटे, नारायण कुडव, प्रशांत रासाईकर, समीर मांद्रेकर, अंकुश बुगडे, नेहाल कशाळकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पालक शिक्षक संघाचे सचिव विठोबा बगळी यांनी केलं. तर जुही थळी यांनी आभार मानले.

हा व्हिडिओ पहाः Video | Indian Peacock | पिसारा फुलवत नाचणारा मोर कॅमेराबद्ध

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!