स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण आवश्यक

चांदेल पंच तथा पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांचं प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी असतं असा कुणी समाज करून घेऊ नये. शिक्षणातून मनुष्याचा सर्वांगिण विकास होत असतो आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असतं, असं प्रतिपादन चांदेल पंच तथा पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी केलं. पेडणे तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवून बारावी परीक्षेत स्वरूपा श्यामसुंदर नाईक हिने यश मिळवल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचाः CRIME UPDATE | अमर नाईक हत्याकांडामागील मुख्य सूत्रधारासाही लवकरच अटक होणार

पेडणे येथील सरकारी उच्च माध्यामिक विद्यालयातून कला शाखेत पेडणे तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवून स्वरूपा नाईक प्रथम आली. याबद्दल तिला गौरव करण्यात आला. यावेळी वारखंड सरपंच संजय तुळसकर, माजी सरपंच मंदार परब, धारगळ माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, कासारवर्णे सरपंच श्याम नाईक आदी उपस्थित होते.

हेही वाचाः प्राचार्य डॉ. भूषण भावेंनी घेतली नवनिर्वाचित राज्यपालांची भेट

ग्रामीण भागातून इंटरनेट सेवा विस्कळीत असतानाही विद्यार्थ्यांनी त्यावर मात करत यश मिळवलं याबद्दल तुळसीदास गावस यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!