‘ईडी’नं जप्त केली अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती ; मनी लॉण्ड्रिंगचा आरोप

अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्यावरही कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या रडावर आला आहे. ईडीने डिनो मोरियाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. डिनो मोरियासोबतच कॉग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या संपत्तीवरही ईडीने कारवाई केली आहे. बँकेची फसवणूक आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केलीय.

पीएमएलए कायद्याअंतर्गत या चारही लोकांच्या संपत्तीच्या जप्तची कारवाई सुरु करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. एकूण ८.७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यात अभिनेता संजय खानची ३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात येत आहे. डीजे अकीलच्या १.९८ कोटी तर इरफान सिद्दीकी यांच्या २.४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.

याप्रकरणी कथितरित्या एकूण १४,५०० कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे प्रवर्तक असलेले नितिन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल हे सध्या फरार असून त्यांनी कर्ज घोटाळ्यातून मिळालेली संपत्ती काही निवडक लोकांकडे सोपवली होती. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.

ईडीच्या माहितीनुसार डिनो मोरिया आणि डीजे अकीलला ही संपत्ती २०११ आणमि २०१२ मध्ये सोपवण्यात आली होती. दोघांनीदेखील संदोसरा बंधुंकडून आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी हा व्यवहार झाल्याचं समोर आलंय. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी डिनो मोरिया आणि डिजे अकीलला काही पैस देण्यात आले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार हे पैसे कंपनीने बँक घोटाळ्यातून मिळवले असल्याने तो गैरव्यवहार आहे. संदेसरा बंधु हे गुजरात मधील एका औषध कंपनीचे मालक आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!