अर्थकारणाला गती देण्याची गरज; स्थानिक लोकांचे व्यवसाय सुरु केले पाहिजेत

पत्रकार परिषदेत वीजमंत्री निलेश काब्राल यांचं भाष्य; घटस्फोट आणि समुपदेशनावर काब्राल यांचं मौन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः नीलेश काब्राल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी घटस्फोट आणि समुपदेश यावर भाष्य करणं टाळलंय. दरम्यान लसीकरण आणि अर्थकारणाला गती देण्यासाठी महत्त्वाची वक्तव्य नीलेश काब्राल यांनी केली आहेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | कोरोना रुग्णवाढ झाली कमी; मात्र सलग तिसऱ्या दिवशी 17 जणांचा मृत्यू

अर्थकारणाला गती देण्याची गरज

आर्थिक व्यवहारांना पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे आहे. आता हायटाईम झालाय. त्यामुळे स्थानिक लोकांचे व्यवसाय सुरू केले पाहिजेत. आता जर व्यवसाय सुरू केले नाहीत, तर मोठं नुकसान होईल. अर्थकारणाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लागू केलेली संचारबंदी उघडावी. पण सीमेवरील निर्बंध मात्र कायम राहिले पाहिजेत, जेणेकरून कोरोना वाढीवर नियंत्रण ठेवणं शक्य होईल. राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोविड-19 निगेटिव्ह सर्टिफिकेट अनिवार्य केलं पाहिजे, असं मंत्री काब्राल म्हणाले.

हेही वाचाः कोलवाळ पोलिस स्थानकाचा मार्ग मोकळा

विवाहपूर्व समुपदेशनावर मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगणार

घटस्फोट आणि समुपदेशनावर काब्राल यांनी मौन धरलं. मात्र याविषयात मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा एकदा आपला दृष्टीकोन मांडणार असल्याचं काब्राल म्हणाले. विवाहपूर्व समुपदेशनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना मी एका श्वेतपत्रिका देणार आहे, जेणेकरून ते या योजनेवर अंतिम निर्णय घेऊ शकतील, असं काब्राल यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचाः CRIME | हणजुण येथे ड्रग्स प्रकरणी एकास अटक

लसीकरण आणि अर्थकारणावर काब्राल यांचं भाष्य

राज्यात होणारे कोविडचे मृत्यू लक्षात घेता आता लसीकरणाला गती आणण्याची गरज असल्याचं काब्राल म्हणालेत. त्याचप्रमाणे आता सगळ्यांचं मोफत लसीकरण केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तसंच विजेच्या बिलाबाबत दिलासा देण्याचे संकेत वीजमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत दिलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!